27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरमुंबईमंत्रीपद घरच्या कामांसाठी वापरणाऱ्या शंभूराज देसाईंनी आमदारकी टिकते का ते पहावे- वंचितच...

मंत्रीपद घरच्या कामांसाठी वापरणाऱ्या शंभूराज देसाईंनी आमदारकी टिकते का ते पहावे- वंचितच इशारा

सातारा जिल्ह्यातील पत्रकार मंडळींबरोबर हुज्जत घातल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले उत्पादनशुल्क मंत्री आणि सातारा-ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पुन्हा वाद ओढवून घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर उत्पादनशुल्क मंत्री आणि सातारा-ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी टीका केली होती. त्याला ‘मंत्रीपद घरच्या कामांसाठी वापरणाऱ्या शंभूराज देसाईंनी आपली स्वत:ची आमदारकी टिकते का ते पहावे’, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात साताऱ्यात वंचित बहुजन आघाडी विरुद्ध शंभुराज देसाई असा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

देसाई हे सत्तेसाठी हपापलेले आहेत. ज्याच्या जिवावर सत्तेची पदे उपभोगली त्यांनाच ते विसरले. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करण्याआधी आमदारकी टिकेल का, याचा विचार देसाई यांनी करावा. ते राज्याचे मंत्री आहेत. पण ताफा घेऊन ते सातारा मध्येच मिरवत आहेत. ते मंत्रीपद घरच्या कामासाठी वापरत आहेत. आपण किती कार्यकुशल आहे हे त्यांनी आधी सिद्ध करावे, त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करावी. सातारा जिल्ह्यासाठी बेजबाबदार ठरलेल्या देसाई यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी बोलताना दहा वेळा विचार करावा. लवकरच पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करणार, असा इशाराही कांबळे यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा 
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आमने सामने भिडणार; कोण कोणावर वरचढ असणार?

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश, वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी 287 कोटी !

हमास विरुद्ध इस्रायल युद्धात हमासची माघार? मृतांचा आकडा आला समोर

माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांचे नातू असणाऱ्या शंभुराज देसाई यांच्या डोक्यात गेल्या काही वर्षात सत्ता गेली आहे. त्यामुळेच की काय ते सातारामधील पत्रकारांना विचारत नाहीत. असा आरोप होत आहे.  मध्यंतरी एका पत्रकार परिषदेत स्थानिक पत्रकारांनी त्यांना एमपीएससी, जिल्हा सामान्य रुग्णालयाची अवस्था आदीबाबत प्रश्न विचारताच ते चिडले. त्यामुळे पत्रकार आणि त्यांच्यात वाद झाला.

अखेर सातारा, सांगलीतील पत्रकार संघटनांनी त्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. शिदे सरकारमधील जे सोळा आमदार अपात्र करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिकेत केली त्यात देसाई यांचाही समावेश आहे. देसाई यांच्या राज्य उत्पादन शुल्क खात्याचे बजेट २५ हजार कोटीचे आहे. पण या खात्यावर मंत्री देसाई यांचा वचक नाही. त्यामुळे काळे धंदे करणाऱ्यांचे फावत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी