पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी, 10 फेब्रुवारी रोजी मुंबईहून दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इतर सर्व रेल्वे गाड्यांपेक्षा वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीटाचे दर सर्वात महाग असतील. (Vande Bharat Express). अर्थात या गाडीमधील प्रवास या मार्गावरील सर्वात वेगवान ठरणार आहे. त्यामुळे मुंबईहून पूर्वीच्या तुलनेत कमी वेळात शिर्डी आणि सोलापूरला पोहोचणे शक्य होणार आहे.
पंतप्रधानांनी झेंडा दाखविल्यानंतर, वंदे भारत एक्सप्रेसच्या दोन्ही नवीन गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (CSMT) येथून रवाना झाल्या. एक गाडी मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर रवाना झाली, तर दुसरी मुंबई-नाशिक-साईनगर शिर्डी मार्गावर धावत आहे. मुंबई-पुणे मार्गावरील सर्व गाड्यांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर जास्त असल्यामुळे मुंबई-पुणेकरांना प्रवास थोडा महाग जाणार आहे.
Confluence of Faith & Progress!
Mumbai-Sainagar Shirdi Vande Bharat Express, an impetus to religious tourism in Maharashtra while creating better opportunities for local economy.#AmchiVande pic.twitter.com/UI6abI4cBt
— Ministry of Railways (@RailMinIndia) February 10, 2023
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सोलापूर दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवेल. ही देशातील 9वी वंदे भारत एक्सप्रेस आहे. ही सेमी हायस्पीड ट्रेन ताशी सरासरी ६९.१५ ते ७० किमी वेगाने धावेल. ही गाडी मुंबई ते सोलापूर हे ४५५ किमी अंतर ६ तास ३५ मिनिटांत कापेल. ही गाडी दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथे थांबेल. सीएसएमटीहून बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस आणि सोलापूरहून गुरुवार वगळून ही गाडी धावणार आहे. या ट्रेनला 16 डबे असतील. 22225 अप आणि 22226 डाऊन असा या ट्रेनचा क्रमांक असेल.
22225 सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे –
AC चेअर कार (CC) :
- सीएसएमटी ते सोलापूर – रु 1,300
- सीएसएमटी ते दादर – रु. 365
- सीएसएमटी ते कल्याण जंक्शन – रु. 485
- सीएसएमटी ते पुणे जंक्शन – रु. 660
- सीएसएमटी ते कुर्डुवाडी – रु. 1,175
एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) :
-
- सीएसएमटी ते सोलापूर – रु. 2,365
- सीएसएमटी ते दादर – रु. 690
- सीएसएमटी ते कल्याण जंक्शन – रु. 905
- सीएसएमटी ते पुणे जंक्शन – रु. 1,270
- सीएसएमटी ते कुर्डुवाडी – रु. 2,110

22226 सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे –
एसी चेअर कार (सीसी) :
- सोलापूर ते सीएसएमटी – रु. 1,150
- सोलापूर ते कुर्डुवाडी – रु. 440
- सोलापूर ते पुणे जंक्शन – रु 845
- सोलापूर ते कल्याण जंक्शन – रु. 1,075
- सोलापूर ते दादर – रु. 1,130
एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) भाडे :
- सोलापूर ते सीएसएमटी – रु. 2,185
- सोलापूर ते कुर्डुवाडी – रु 835
- सोलापूर ते पुणे जंक्शन – रु. 1,575
- सोलापूर ते कल्याण जंक्शन – रु. 2,025
- सोलापूर ते दादर – रु. 2,145
केटरिंग शुल्क:
या ट्रेनमध्ये खाद्यपदार्थांची निवड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. तथापि, जर कोणी नो फूडचा पर्याय निवडला असेल, तर कॅटरिंग शुल्क हे भाड्यातून वजा केले जाईल.
हे सुद्धा वाचा :वंदे भारत एक्सप्रेस का आहे खास, ते जाणून घ्या…
मुंबई शिर्डी प्रवास होणार वेगवान अन् आरामदायी; राज्यात दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर; वंदे भारत एक्सप्रेसचे करणार लोकार्पण
वंदे भारत एक्सप्रेस
वंदे भारत एक्सप्रेस ही पूर्णत: भारतात निर्मित 16 डब्यांची, सेमी हायस्पीड, स्वयंचालित ट्रेन सेट आहे. ही ट्रेन 140 सेकंदात 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. प्रवाशांना या ट्रेनमध्ये पूर्ण आराम मिळतो. या ट्रेनमध्ये बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स आहेत, जे विमानातील टॉयलेट्ससारखे असतात. डब्यांमध्ये टच-फ्री स्लाइडिंग दरवाजे आणि सरकत्या पायऱ्यांसह स्वयंचलित प्लग दरवाजे आहेत. या एक्सप्रेसमध्ये ‘कवच’ नावाची दोन रेल्वेगाड्यांची टक्कर रोखणारी प्रतिबंधक यंत्रणाही बसवण्यात आली आहे.