29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
HomeमुंबईVarsha Usgaonkar : वर्षा उसगावकर यांना मिळणार सडलेले मासे !

Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकर यांना मिळणार सडलेले मासे !

चित्रपटसृष्टीतील देखण्या अभ‍िनेत्रींपैकी एक नाव म्हणजे वर्षा उसगावकर होय. गोरापान वर्ण, घारे डोळे, दिलखेचक आदांनी रस‍िक प्रेक्षकांना मोहिनी घालणारी ही 90 च्या दशकातली अभ‍िनेत्री आता नवीन चित्रपटांमध्ये फारशी दिसत नाही. मात्र तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे ती चर्चेमध्ये आली आहे.

चित्रपटसृष्टीतील देखण्या अभ‍िनेत्रींपैकी एक नाव म्हणजे वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) होय. गोरापान वर्ण, घारे डोळे, दिलखेचक आदांनी रस‍िक प्रेक्षकांना मोहिनी घालणारी ही 90 च्या दशकातली अभ‍िनेत्री आता नवीन चित्रपटांमध्ये फारशी दिसत नाही. मात्र तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे ती चर्चेमध्ये आली आहे. मराठी सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकरांनी एका ऑनलाईन मासे विक्रेत्या कंपनीचे प्रमोशन करतांना मासे विक्रेत्या कोळी महिला ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुंबईतील कोळी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा न‍िषेध केला आहे. वर्षा उसगावकर यांनी कोळी समाजाची माफी माग‍ितली नाही तर त्यांना सडलेले मासे खाऊ घालतील, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिला आहे.

ऑनलाईन ॲपवर मच्छी विकणारे स्वत: कोणती मासेमारी करतात? असा प्रश्न करुन हे ॲपवाले जर कोळी समाजाकडून मासे खरेदी करतात. मग कोळयांची मच्छी खराब आणि त्यांची मासळी ताजी कशी? असा प्रश्न कोळी महिलांनी विचारला आहे. मराठी कष्टकरी महिलांचा अपमान सुप्रसिद्ध अभ‍िनेत्रीकडून होणे ही दुदैवी घटना आहे. हा अपमान सहन केला जाणार नाही. असा इशारा सगळया कोळी बांधवांनी दिला आहे. वर्षा उसगावकर यांचा जन्म गोव्यातला आहे. त्यामुळे त्यांचा आणि समुद्राचा फार जवळचा संबंध आहे. वर्षा उसगावकर यांनी मासे, मासेमारी, कोळी समाज, होडया, समुद्र हे सगळे जवळून बघ‍ितले असणार. कारण समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्यांना हे सगळे माहित असते.

मासे लोक खूप चवीने खातात. मांसहारी लोक तर त्यावर तुटून पडतात. परंतु हा व्यवसाय करणे किती अवघड आहे. ते करणाऱ्यांनाच माहित आहे. मासेमारीला जाणारे नाखवा आठ ते दहा दिवस खोल समुद्रात जातात. तिथेच बोटी नांगरुन मासे जाळयात येईपर्यंत वाट पाहत राहतात. चारही बाजूला पाणीच पाणी असते. रात्री गर्द अंधार असतो. जेवण बोटीतच बनवावे लागते. अंघोळ खाऱ्या पाण्याने करावी लागते. रात्री नीट झोपू शकत नाही. समुद्राच्या लाटा कधीही थांबत नाहीत. उलट एखादयावेळी वादळ सुटतं. समुद्रात तुफान येते. समुद्र खवळतो. त्यावेळी जीवावर उधार होऊन हे मासेमार लोक कसे बसे किनाऱ्यावर येतात. शिवाय समुद्रात अनेक प्रकारच्या दुर्घना घडू शकतात. त्यामुळे त्यांची जिवन हे अत्यंत जिकरीचे असते. रात्री अपरात्री बोटी बंदरावर येतात.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : ‘मुख्यमंत्री शिंदे यांना गणेशोत्सवानंतर पितरं सुद्धा अटेंड करावी’

Maharashtra Politics : भाजप नेता म्हणतो, निवडणुका जिंकण्यासाठी दारूड्यालाही जवळ करावे…

Abdul Sattar : ‘…तुमची गाठ माझ्याशी आहे’, अब्दुल सत्तारांनी भरला दम’

ऊन, वारा, पाऊस, थंडी, सण, उत्सव कशाची पर्वा न करता या कोळी महिला मासे साफ करुन विकायला आणतात. दिवसभर बाजारात बसतात. मासे टिकवण्यासाठी तासनं तास बर्फात हात घालतात. तेव्हा ग्राहकांना ताजे मासे मिळतात. अशा प्रकारे अत्यंत कष्टाचे जिवन जगुन तुमच्या चिभेचे चोचले पुरवणाऱ्या महिलांचा अपमान करणे म्हणजे शुद्ध मुर्खपणा आहे. ते अभिनय करण्या इतके सोपे नाही. कारण वास्तव ज‍िवन आणि अभ‍िनयात फार फरक आहे. वास्तवात खाणीत हात घालून काम करावे लागते. डोक्यावर ओझे वाहावे लागते. तेव्हा पैसे मिळतात.

Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकर यांना मिळणार सडलेले मासे !

त्या पैशांमध्ये घर चालवावे लागते. शिवाय बोटींचा मेंटेन्स असतो. खलाशांचा पगार, बोटींची दुरुस्ती, जाळयांचा खर्च, डीझेलचा खर्च असतो. हे काम अभ‍िनय करण्या इतके सोपे नक्कीच नसते. अभिनयात काही दिवसांत लाखों करोडोची कमाई होते. इथे हजारो रुपये कमवायला अवघे जिवन खर्च करावे लागते. त्यामुळे व्हाईट कॉलर जिवन जगणाऱ्या व्यक्तींनी वक्तव्य करतांना जपून करायला हवे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी