30 C
Mumbai
Wednesday, August 30, 2023
घरमुंबईखासदार श्रीकांत शिंदेंच्या सौभाग्यवतीने धरला मंगळागौरचा फेर !

खासदार श्रीकांत शिंदेंच्या सौभाग्यवतीने धरला मंगळागौरचा फेर !

महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीत अनेक परंपरा आजही लोक मोठ्या उत्साहाने जपत असतात. विविध परांपरांनी नटलेल्या या महाराष्ट्रात सण आणि उत्सवांची सतत रेलचेल चालू असते. महाराष्ट्रालाा लाभलेल्या अश्याच सांस्कृतिक परांपरापैकी एक उत्सव म्हणजे मंगळागौर. हा विशेष उत्सव दरवर्षी महिलावर्गाद्वारे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. फक्त महिलांसाठीच असलेला मंगळागौर हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदा, महाराष्ट्रातील सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरात मंगळागौरीचे आयोजन करण्यात आले होते. या मंगळागौरीच्या खेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुन आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी उपस्थिती लावली होती.

डोंबिवली शहरात मंगळवारी शिवसेना शहर शाखा आणि डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या वतीने मंगळागौर आयोजित करण्यात आली होती. सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे महाराष्ट्र सचिव आणि सिने अभिनेते सुशांत शेलार यांनी विशेष उपस्थिती लावली होती. याचबरोबर अनेक महिलांसमवेत सौ. वृषाली शिंदे या ही कार्यक्रमात उपस्थित होत्या. इतर महिलांसमवेत मंगळागौरीच्या खेळात सहभाग घेत त्यानीही कार्यक्रमाचा आनंद लुटला.

या कार्यक्रमाला महिलावर्गाने मोठी उपस्थिती लावली होती. महिलांनी विविध खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग होत पारंपरिक खेळ, नृत्य आणि गाण्यांचा मनमुराद आनंद लुटला. आपल्या दैनंदिन व्यापातून वेळ काढून या पद्धतीने सर्व माता भगिनींना मनमुरादपणे उत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने डोंबिवलीत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हे ही वाचा 

रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीने वाचवला भावाचा जीव; नवी मुंबईत अनोख्या पद्धतीचे रक्षाबंधन!

एकनाथ शिंदेंच्या होम ग्राउंडमधील प्रकार; ठाण्यात परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसवले!

रक्षाबंधन सणानिमित्त व्यापाऱ्यांकडून ‘केक’चे लाल गाजर !

मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत असून ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करत विविध खेळ खेळले जातात.

मंगळागौर जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणी म्हणण्यात येतात. यामध्ये, लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं यांसारखी गाणी म्हणण्यात येतात. नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते.वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा – इत्यादी. असे साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात.यात सुमारे २१ प्रकारच्या फुगड्या, ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात.पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणा-या महिलांना या खेळातून आनंदही मिळे. हे खेळ खेळताना महिला त्याजोडीने गाणीही म्हणतात.मंगळागौर हे व्रत कष्टाचे, दमणुकीचे नसून चापल्य देणारे, चैतन्य देणारे व सामुहिक जीवनाचा आनंद देणारे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी