36 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमुंबई'मोडक सागर' आणि 'तानसा धरण' ओव्हरफ्लो

‘मोडक सागर’ आणि ‘तानसा धरण’ ओव्हरफ्लो

टीम लय भारी

मुंबई : गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. मात्र अशातच मुंबईकरांसाठी एक मोठा दिलासा देणारी माहिती समोर आलीआहे. पाणलोट क्षेत्रातील संततधार आणि मुसळधार पावसामुळे 10 दिवसांत मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांच्या एकत्रित पाणीसाठ्यात पाच पटीने वाढ झाली आहे. 5 जुलै रोजी नोंदवलेला पाणीसाठा 14,76 टक्के होता. तो आता 74,82 टक्क्यांवर पोहोचला आहे. असे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर आणि तानसा ही दोन धरणे गुरुवारी ओसंडून वाहू लागली.

मुंबई महानगराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.36,61,133 दशलक्ष लिटर प्रतिदिन एमएलडी साठवण क्षमता असलेले मोडक सागर बुधवारी दुपारपासून ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली. तर 96,894 एमएलडी साठवण क्षमता असलेले तानसा धरण गुरुवारी संध्याकाळपासून ओव्हरफ्लो झाले. या जलाशयांची एकत्रित पाणी साठवण क्षमता 14,47,363 एमएलडी आहे. या ठिकाणांहून शहराला दररोज 3,850 एमएलडी पिण्यायोग्य पाणी पुरवठा केला जातो.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर आणि तानसा ही दोन धरणे गुरुवारी ओसंडून वाहू लागली. महानगरपालिका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या पंधरवड्यात पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सात पैकी दोन धरणे गेल्या 48 तासांत ओसंडून वाहू लागली आहेत.

हे सुध्दा वाचा:

विधीमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले

जनसेवेसाठी सदैव कटीबद्ध राहीन- धनंजय मुंडे

आता सभागृहात ‘हे‘ शब्द बोलण्यास बंदी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी