33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
HomeमुंबईMumbai Railway Bridge : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाने धोकायदायक पुलांबाबत मुंबईकरांना केले...

Mumbai Railway Bridge : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाने धोकायदायक पुलांबाबत मुंबईकरांना केले आवाहन

मुंबईमध्ये उद्या (ता. 31 ऑगस्ट) पासून गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात होईल. ज्यामुळे मुंबईच्या प्रत्येक भागात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळेल. पण बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील 13 धोकादायक पुलांवर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये उद्या (ता. 31 ऑगस्ट) पासून गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात होईल. ज्यामुळे मुंबईच्या प्रत्येक भागात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळेल. पण बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील 13 धोकादायक पुलांवर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील चार तर पश्चिम रेल्वे मार्गावरील नऊ पुलांचा समावेश आहे. या पुलांवर कोणत्याही मंडळांनी किंवा गणेश भक्तांनी जास्त वेळ थांबू नये. तसेच नाच-गाणे करत या पुलांवरून न जाण्याची विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर असलेले हे पूल धोकादायक झालेले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सदर रेल्वे पुलांचे काम हे पावसाळ्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती देखील मुंबईत महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वे मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून जाणारे पूल हे जुने आणि धोकादायक स्वरूपाचे झालेले आहेत. यामधील मध्य रेल्वे मार्गावरील चार पूल आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण नऊ पूल सध्या धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने सर्व गणेश भक्तांना सूचना देत आवाहन केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणेश भक्तांनी गणेश आगमन आणि विसर्जनासाठी पुलावरुन जाताना ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये, तसेच नाच-गाणी इत्यादी बाबी टाळाव्यात. त्याचबरोबर पुलावर अधिक वेळ न थांबता पुलांवरुन त्वरित पुढे जावे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई वाहतूक पोलिस यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील मध्य रेल्वे लाईनवरून जाणाऱ्या चार पुलांमध्ये घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज, करीरोड रेल ओव्हर ब्रिज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज आणि भायखळा रेल ओव्हर ब्रिज या पुलांचा समावेश आहे. तर, पश्चिम रेल्वे लाईनवरून जाणाऱ्या नऊ पुलांमध्ये मरिन लाईन्स रेल ओव्हर ब्रिज, ग्रँटरोड व मुंबई सेंट्रलच्या दरम्यान असणारा फॉकलंड रेल ओव्हर ब्रिज, मुंबई सेंट्रलच्या जवळ असणारा बेलासिस पूल, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज, प्रभादेवी कॅरोल रेल ओव्हर ब्रिज, दादर टिळक रेल ओव्हर ब्रिज यांच्यासह ग्रँटरोड व चर्नीरोडच्या दरम्यान असणारे सँडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज, फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज आणि केनडी रेल ओव्हर ब्रिज या पुलांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

Mumbai Metro 3 : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुलाबा सिप्झ मेट्रो लाईन-3 ची यशस्वी चाचणी

Ganpatichi Aarti : आरतीमधील चुकीच्या शब्दांच्या उच्चारामुळे आरतीचा भावार्थ बदलतो

Milk Rate Increases : बाप्पाच्या सणाला ‘महागाई’चे नैवेद्य, दुधाच्या दरात पुन्हा वाढ

करीरोड रेल ओव्हर ब्रिज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज आणि भायखळा रेल ओव्हर ब्रिज या पुलांवर एकावेळेस 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही, याची काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मध्य रेल्वे लाईनवरील चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज (आर्थर रोड) आणि करीरोड रेल ओव्हर ब्रिज पार करताना बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिस यांच्याद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करण्याची विनंती देखील मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेश भक्तांना मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी