38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रअदानी समूहाच्या साम्राज्याला ग्रहण लावणारा अँडरसन आहे तरी कोण? शॉर्ट सेलर असल्याचा...

अदानी समूहाच्या साम्राज्याला ग्रहण लावणारा अँडरसन आहे तरी कोण? शॉर्ट सेलर असल्याचा अदानींचा आरोप

शेअर मार्केटची मानसिकता जाणून घेणे सामान्य माणसाच्या कुवतीच्या बाहेरचे आहे. इथे एका क्षणात राजाचा रंक आणि रंकाचा राजा होतो. जगातील भांडवलदारांचा हा सर्वात मोठा अड्डा आहे. शेअर बाजारातील सूक्ष्म बारकावे जाणून घेण्यासाठी हयात घालवावी लागते. बाजारातील सतत फिरत राहणाऱ्या पटलावरील आकड्यांच्या पलीकडला 'खेळ' ज्याला समजला तोच यावर अधिराज्य गाजवू शकतो. पण कितीही चतुराईने हेराफेरी केली तरी तो ठग कधी ना कधी कायदयाच्या कचाट्यात सापडतोच. अथवा नॅथन अँडरसनसारखा एखादा जागत्या (whistleblower) गौतम अदानींसारख्या ठगांच्या साम्राज्याला ग्रहण लावतो. कोण आहे हा नॅथन अँडरसन? त्याची कंपनी काय करते? ती त्याने कशी स्थापन केली? जाणून घ्यायचेय..?

अमेरिकन कंपनी ‘हिंडेनबर्ग‘ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर गौतम अदानींच्या साम्राज्याला उतरती कळा लागायला सुरुवात झाली. एका अहवालाने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहा क्रमांकामध्ये असलेले अदानी थेट २१ व्या स्थानावर फेकले गेले. त्यांच्या आर्थिक साम्राज्याची धूळधाण झाली. ‘Bloomberg Billionaires Index‘ च्या अनुसार अदानींच्या संपत्तीत घाट होऊन ती ६१.३ अब्ज डॉलर्स इतकीच राहिली आहे. (Who is Anderson Shocks to the industrial empire) मागील २४ तासांत अदानी समूहाला १०.७ अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन कारवाई लागले आहे. गौतम अदानींच्या औद्योगिक साम्राज्याला धक्क्यावर धक्के देणारा नॅथन अँडरसन आहे तरी कोण हे जाणून घेऊ या…

नॅथन अँडरसनने अमेरिकेतील ‘कनेक्टिकट युनिव्हर्सिटी’मधून आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर इतर सर्वसामान्य तरुणांनासारखेच त्यानेही नोकरीच्या शोधात भटकंती सुरुवात केली. एका डेटा रिसर्च कंपनीत त्याने नोकरीला सुरुवात केली.या कंपनीत आर्थिक व्यवहारासंबंधीबाबतच्या कामकाजाची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती.

२०१७ मध्ये स्वतःच्या कंपनीची सुरुवात
नोकरी करत असतानाच अँडरसन शेअर मार्केटमधील बारकावे जाणून घेऊ लागला होता. शेअर बाजार हा जगातील भांडवलदारांचा सर्वात मोठा अड्डा आहे. या सट्टा बाजारात बरंच काही घडत आहे आणि हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे, याची त्याला जाणीव झाली. यातूनच मग अँडरसनच्या सुपीक डोक्यात आर्थिक संशोधन करण्यासाठी एक कंपनी स्थापन करण्याची कल्पना सुचली. २०१७ मध्ये अँडरसन ‘हिंडेनबर्ग’ नावाची एक कंपनी स्थापन केली.

नेमके कसले संशोधन करते?
या कंपनीचे मुख्य काम शेअर मार्केट, इक्विटी, क्रेडिट, आणि डेरिव्हेटीव्ह याबाबत संशोधन करणे आहे. या संशोधनाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये पैशांची अफरातफरी तर होत नाही ना याची माहिती काढली जाते. कित्येक मोठ्या कंपन्यांकडून स्वतःच्या फायद्यासाठी आर्थिक गैरव्यवस्थापन तर होत नाही ना हे तपासले जाते. तसेच आपल्या फायद्यासाठी अन्य कंपन्यांच्या शेअर्सवर सट्टा लावला जात आहे का हे सर्व शोधण्याचे काम ‘हिंडेनबर्ग’ ही कंपनी करते. त्यानंतर ही कंपनी आपला अहवाल प्रकाशित करते. या कंपनीने अशा प्रकारचे अहवाल प्रकाशित केल्यानंतर जगातील शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Who is Anderson Shocks to the industrial empire

नॅथन अँडरसनविरोधात अदानींची सर्वोच्च नायायालयात धाव
अदानी समूहाविरुद्ध ‘हिंडेनबर्ग’ने जो अहवाल सादर केला आहे, त्याविरोधात अदाणींनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली असून हा कथित घोटाळा उघडकीस आणणाऱ्या ‘हिंडेनबर्ग’ कंपनीचे मालक आणि संस्थापक अँडरसनच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. वकील मनोहर लाल शर्मा यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

अँडरसन हा शॉर्ट सेलर
अँडरसनवर या याचिकेत गंभीर आरोप करण्यात आले असून तो हा शॉर्ट सेलर असल्याचे म्हंटले आहे. निर्दोष गुंतवणूकदारांचे त्याने शोषण केले असून त्याने केलेल्या फसवणुकीची चौकशी करण्याची मागणी अदानी समूहाने या याचिकेत केली आहे. तसेच अँडरसनने गुंतवणूकदारच्या पैशांची भरपाई करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.

अदानी समूहाला बँकांकडून ८१,२०० कोटींचे कर्ज
देशातील नामांकित बँकांनी अदानींना तब्बल ८१,२०० कोटींचे कर्ज दिले आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने अदानी समुहाला २३,००० कोटींचे कर्ज दिले असल्याची माहिती एसबीआयने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेने ७,००० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. अदानी समूहाला दिलेल्या कर्जाबाबत लोकांनी मनात भीती बाळगण्याची आवश्यकता नसल्याची ग्वाही एसबीआयच्या अध्यक्षांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

Gautam Adani : ‘2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल’

ग्रह फिरले : अदानींना दिलेल्या कर्जाची आकडेवारी सादर करा; आरबीआईचे बँकांना निर्देश

न्यूमोनिया बरा करण्यासाठी लोखंडी सळईचे ५१ वेळा चटके ; ३ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी