26 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरमुंबईमुंबई लवकरच होणार खड्डेमुक्त?

मुंबई लवकरच होणार खड्डेमुक्त?

टीम लय भारी

मुंबई : रोजच्या प्रवासात मुंबईत सगळ्यात जास्त त्रासदायक ठरणारा विषय म्हणजे ‘खड्डे’. कोणत्याही मार्गाने जा खड्ड्यांनी चाळण झालेल्या रस्त्यांचे दृष्य सगळीकडे सर्रास पाहायला मिळतात, परंतु या खड्ड्यांच्या त्रासातून मुंबईकरांची लवकरच सूटका होणार आहे. खड्ड्यांमुळे हाडं खिळखिळी करणाऱ्या मुंबईकरांसाठी शिंदे सरकारने काल महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयात मुंबईतील सर्व रस्ते येत्या दोन वर्षात सिमेंटचे करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ही घोषणा केवळ मुंबईपुरतीच मर्यादित न राहता मुंबईच्या आजूबाजूच्या पोलिसी क्षेत्रासाठी सुद्धा लागू करण्यात येणार आहे.

खड्ड्यांमुळे वाहतुक कोंडीची समस्या शहरात वाढू लागली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील रस्त्याची सुद्धा खड्यांमुळे अवस्था कमालीची बिकट आहे त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा टीका करण्यात आली होती. या संपुर्ण पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईला येत्या दोन वर्षांत खड्डेमुक्त होणार अशी घोषणाच केली आहे.दरम्यान मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काॅंक्रीटीकरणाला वेग देण्यात आला असून येत्या दोन वर्षांत सर्व कामे पूर्ण होऊन मुंबई खड्डे मुक्त होईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने डॉ. इकबाल सिंह चहल यांनी म्हटले आहे.

शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील  मुंबईतील रस्ते सुधारणा कामांची आढावा बैठक घेतली. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील रस्ते सुधारणीबाबत डॉ. इकबाल सिंह चहल यांनी यावेळी सादरीकरण केले.

सध्या 236 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे, तर 400 किलोमीटरची कामे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 2023-24 मध्ये आणखी 423 किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण काम हाती घेणार असून मुंबईतील नवीन सिमेंट रस्त्यांवर पाण्याचा निचरा होण्यासाठी ठराविक अंतरावर शोषखड्डेही असतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून रस्ते वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : निर्भीड पत्रकार ‘लोकमान्य टिळक’

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी केली सारवासारव

तडजोड ही करावीच लागणार – उपमुख्यमंत्री

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!