31 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeमुंबईGaneshotsav 2022 : बाप्पाची पूजा करा 'या' शुभ मुहूर्तावर

Ganeshotsav 2022 : बाप्पाची पूजा करा ‘या’ शुभ मुहूर्तावर

हा मुहूर्त 31 ऑगस्टला दुपारी 3.30 मिनीटांनी समाप्त होईल. यंदा गणेश चतुर्थी ही बुधवारी आहे. बुधवार हा गणेशाचा वार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गणपती बाप्पाला मोदक अतिषय प्रिय आहेत.

संपूर्ण देशामध्ये गणेशोत्सवाची धूम सुरु झाली आहे. प्रत्येक गणेश‍भक्ताला गणपतीच्या आगमनाची प्रतिक्षा आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे गणेशोत्सवावर निर्बंध होते. मात्र या वर्षी ‘बाप्पाचा उत्सव’ धुमधडाक्यात होणार आहे. त्यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. या वर्षी गणेश चतुर्थी 31 ऑगस्टला  आहे. याच दिवशी गणपतीची स्थापना केली जाणार आहे. त्या पुजेसाठीचा मुहूर्त पाहू या.

गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त :

यावर्षी गणेशोत्सव बुधावारी 31 ऑगस्टला आहे. या दिवशी तुम्ही गणपतीची स्थापना करणार आहात. त्यासाठी भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3.34 वाजता सुरु हाईल. हा मुहूर्त 31 ऑगस्टला दुपारी 3.30 मिनीटांनी समाप्त होईल. यंदा गणेश चतुर्थी ही बुधवारी आहे. बुधवार हा गणेशाचा वार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गणपती बाप्पाला मोदक अतिषय प्रिय आहेत.

गणेश चतुर्थीला गणपतीला नैवेदय दाखवण्यासाठी तांदळाच्या पीठापासून ओल्या नारळाचे मोदक केले जातात. गणपती बाप्पाला मोदक लाडू, लाल फूल, शेंदूर, अष्टगंध आवडतो. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी व्रत साजरे केले जाते.या चतुर्थीला ‘सिद्धी विनायक’ व्रत असेही म्हणतात. दरवर्षी गणपती बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करतात. हा उत्सव 10 दिवस चालतो. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती असे गणेत्सव महाराष्ट्रात साजरे केले जातात.

हे सुद्धा वाचा

Ashtavinayak Darshan : अष्टविनायक दर्शन- चौथा गणपती’ रांजणगाव’चा महागणपती

Ashtavinayaka Darshan : अष्टविनायक दर्शन- त‍िसरा गणपती भीमेच्या तिरावरचा ‘सिद्धटेकचा’ सिद्धिविनायक

VIDEO : अष्टविनायक दर्शन – पहिला गणपती मोरगावचा ‘मोरेश्वर’

कथा :
गणपती बाप्पा संबंधीत एक पौराण‍िक कथा प्रसिद्ध आहे. पार्वती देवीने भगवान गणेशाची निर्मिती मातीपासून केली. पार्वतीदेवी अतिशय शक्तीमान असल्याने तिने त्याला सामर्थ्य आणि शक्ती दिली. त्यामुळे गणपती बाप्पा शक्तीमान बनले. त्यांना कोणीही हरवू शकत नाही. एकदा भगवान शंकरांना खूप राग आला होता. त्यावेळी त्यांनी रागाच्या भरात गणेशाचा शिरच्छेद केला. माता पार्वतीला याबाबत कळले. त्यांनी गणपतीला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी हत्तीचे मुंडके लावले. कोणत्याही शुभ कार्याच्यावेळी गणपतीची प्रथम पूजा केली जाते. गणपती बाप्पा हे विद्या आणि शक्तीचे प्रतिक आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी