28 C
Mumbai
Wednesday, September 6, 2023
घरमहाराष्ट्रयोगी आदित्यनाथ शिवरायांच्या मूर्तीपुढे झाले नतमस्तक!

योगी आदित्यनाथ शिवरायांच्या मूर्तीपुढे झाले नतमस्तक!

उत्तरप्रदेशमध्ये नवनवीन उदयोगांची उभारणी व्हावी यासाठी मुंबई भेटीवर (Mumbai visit) आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे नतमस्तक होत आदरभाव व्यक्त केला. योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. मुंबईतील उद्योगपती (Businessman), हिंदी सिनेसृष्टील (Bollywood) नामवंत मंडळींच्या व्यावसायिक भेटीगाठी घेण्यापूर्वी योगी आदित्यनाथांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी केलेल्या विनंतीनंतर योगी यांनी राजभवनातील १९ व्या शतकातील ब्रिटिशकालीन भुयारातील “क्रांतिगाथा” या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील वर्षी जून महिन्यात या संग्रहालयाचे उदघाटन करण्यात आले होते. (Yogi Adityanath offered his respect at the statue of Shivaji Maharaj!)

राजभवनातील भुयारात असलेल्या या  “क्रांतिगाथा”  संग्रहालयात शिवाजी महाराजांचा पुतळादेखील आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होत त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून क्रांतिकारकांची आणि त्यांच्या कार्याची माहिती करून घेतली. त्यांनतर आदित्यनाथ यांनी भूमिगत संग्रहालाबाहेर समुद्रकिनारी असलेल्या श्रीगुंडी देवीचे दर्शन घेत उपस्थितांसोबत देवीची आरती केली. त्यांनतर त्यांनी नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या ध्यानमग्न शिवाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.

हे सुद्धा वाचा

रिषभ पंतच्या नावाने गिरगाव चौपाटीवर फलक

‘आता उरलेले उद्योग उत्तर प्रदेशच्या घशात घालण्यासाठी योगींना पायघड्या’

अजित पवार भूमिकेवर ठामच; स्वराज्यरक्षक ही उपाधी व्यापक आणि सर्वसमावेशक

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत दौऱ्यावर असून ते महाराष्ट्रातील बडे उद्योगपती, बँकर्स तसेच हिन्दी सिनेसृष्टीला निर्माते आणि दिग्दर्शकांच्या भेटी घेणार आहेत. उत्तरप्रदेशमध्ये उद्योगधंदे आणि चित्रपट क्षेत्राच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी योगी आदित्यनाथ प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्यनाथ यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करताना काँग्रेसचे प्रदशध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्रातील उद्योग याआधी राज्याबाहेर घालविले आता उरलेले उद्योगदेखील उत्तरप्रदेशात घालविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने योगी आदित्यनाथ यांना पायघड्या घातल्या आहेत. तर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही योगी आदित्यनाथ यांना टोला लगावत तुम्ही मुंबईत येण्याबाबत आम्हाला कोणताही आक्षेप नाही पण या ठिकाणी येऊन राजकारण करू नका.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी