28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयआगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचितची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत...

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचितची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी

टीम लय भारी

मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीने ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या नेत्यांसमवेत चर्चा केली. त्याच प्रमाणे राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांबरोबर ही चर्चा झाली(Municipal elections: Disadvantaged alliance with Rashtriya Janata Dal and Muslim League)

या चर्चेमधे तीन पक्षांनी एकत्र येऊन आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आघाडीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या इतर काही संघटनांच्या बरोबर ही चर्चा सुरू आहे. इतर काही संघटना यामध्ये आगामी काळात सामील होतील. तशी बोलणी चालू आहेत.

HDFC लाईफची निवृत्ती योजना, पॉलिसीच्या सुरुवातीलाच वार्षिक व्याज करा लॉक

हिवाळ्यात ‘हे’ पदार्थ करणार तुमचे सर्दी, खोकल्यापासून संरक्षण

साधारणत: जानेवारीच्या मध्यापर्यंत यातील जागावाटप निश्चित करून प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाहीर करण्यात येईल. या वाटाघाटीं मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर, ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार महेंद्र रोकडे, वंचित बहुजन आघाडीचे मुंबई महानगर अध्यक्ष अबुल हसन खान, अब्दुल बारी, प्रोफेसर मापारी यांनी बोलणी करून वाटाघाटी यशस्वी केल्या.

मुस्लिम लीग तसेच राष्ट्रीय जनता दल बरोबर आम्ही ही निवडणूक लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आंबेडकर भवन या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आम्ही मुंबई मनपाची निवडणूक राष्ट्रीय जनता दल व मुस्लिम लीग याना बरोबर घेऊन लढत आहोत.

OnePlus 10 Pro लाँच होणार, जाणून घ्या नवीन फोनमध्ये काय असेल खास?

Maharashtra: Day after SC stay, SEC defers local body polls for OBC category

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत एमआयएम बरोबर युती करण्याचा विचार नाही. शिवसेना वा काँग्रेस साठीही आमचे दार उघडे आहे असे एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. ओबीसींनी औरंगाबाद लोकसभेत सेक्युलर भूमिकेतून मतदान केले असूनही औरंगाबाद मधे एमायएमने सेक्युलर भूमिकेतून प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांच्याबरोबर जाता येत नाही.

ओबीसींना विश्वास देण्याचे काम एमायएमने केले तर आगामी काळातील निवडणुकांबाबत विचार होऊ शकेल. असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ओबीसी ना आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी भाजपा सोडून कोणालाही मतदान केले पाहिजे.

प्रकरणी त्यांना विचारले असता परीक्षा घेण्याचे कंत्राट खाजगी संस्थेला का देतात यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एमपीएससी हे बोर्ड रद्द केलं पाहिजे असे त्यांनी सांगितले. ओबीसीला आरक्षण हवे असेल तर येत्या निवडणुकीत भाजपाला पाडल्याशिवाय गत्यंतर नाही.

सर्वोच्च न्यायालयाला हवा असलेला इम्पीरिकल डेटा हा जनगणनेतूनच मिळू शकतो. कोर्टाने राखीव जागांना विरोध केलेला नाही. राखीव जागांना पाठबळ देणारा मागासलेपणाचे मोजमाप करणारा डेटा जनगणनेतून मिळेल. व हा डाटा सादर केल्यानंतर त्यानंतरच ओबीसींना आरक्षणाचा प्रश्न मोकळा होईल असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी