32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रओबीसी आरक्षणाशिवाय 15 महानगरपालिकांच्या निवडणूका होणार : सुप्रीम कोर्टाचा आदेश

ओबीसी आरक्षणाशिवाय 15 महानगरपालिकांच्या निवडणूका होणार : सुप्रीम कोर्टाचा आदेश

टीम लय भारी

मुंबई : महानगरपालिका निवडणूकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. राज्यात १५ महापालिकांच्या निवडणूका होणार असून या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. प्रशासकाला ६ महिनेही पूर्ण झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका वेळेतच घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला. (Municipal elections without OBC reservation: Supreme Court)

राज्य सरकारने डिसेंबर २०२२ पर्यंत अवधी मागितला होता परंतु कोर्टाने अवधी देण्यास नकार दिला. तर पावसाळ्याचे कारण राज्य सरकारनं पुढे केले परंतु आता पुन्हा मुदत वाढविता येणार नसल्याचे कोर्टाने सांगितले. इतर ८ राज्यात निवडणूक वेळापत्रकाचे अधिकार राज्याकडे असल्याचा मुद्दा राज्य सरकारनं पुढे केला परंतु आत्ता महाराष्ट्रातील निवडणूकीचा मुद्दा आहे. आणि महापालिकेचा कालावधी संपला आहे.

इथे होणार निवडणूका

१५ महापालिका
२१० नगर परिषदा
१० नगर पंचायती
१९३० ग्राम पंचायती निवडणूका होणार

या आहेत 15 महानगरपालिका 

  • मुंबई
  • पुणे
  • ठाणे
  • उल्हासनगर
  • पिपंरी चिंचवड
  • सोलापूर
  • अकोला
  • अमरावती
  • नागपूर
  • नवी मुंबई
  • औरंगाबाद
  • वसई-विरार
  • कल्याण
  • डोंबिवली
  • कोल्हापूर

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात १५ महापालिकेच्या निवडणूका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. ओबीसी आरक्षणा शिवाय या निवडणूका घ्याव्या लागणार आहेत.
यात मुंबई ठाणे पुणे नागपूर उल्हासनगर पिपंरी चिंचवड सोलापूर अकोला अमरावती नवी मुंबई औरंगाबाद वसई-विरार कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर यांचा समावेश आहे. याशिवाय २१० नगर परिषदा, १० नगर पालिका आणि १९३० ग्राम पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. (Municipal elections without OBC reservation: Supreme Court)


हे सुद्धा वाचा :

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचितची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी

पूर प्रतिरोधक मुंबईसाठी रोडमॅप विकसित २ दिवसीय कार्यशाळेचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

महानगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचितची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी

Can’t sack employee for suppression of criminal case: Supreme Court

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी