28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeनिवडणूकउमेदवारीसाठी बायको पुढे, सत्ता मात्र नवऱ्याच्या हाती, हेमंत पाटील यांची टीका

उमेदवारीसाठी बायको पुढे, सत्ता मात्र नवऱ्याच्या हाती, हेमंत पाटील यांची टीका

टीम लय भारी

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (Nagar Parishad elections) महिलांना ५० टक्के आरक्षण असूनही अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार महिलांच्या हाती असून कारभार मात्र पतीदेवच पाहत असतात. असे विदारक चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नेहमीच गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीसाठी (Election) सज्जे असणाऱ्या पुरुष उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. मात्र बायकोला उमेदवारी देऊन त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी पतीदेवांनी प्रयत्नांची उलथापालथ केली.(Gram Panchayat or Nagar Parishad elections, power is in the hands of women and male candidates are in control)

अनेक ग्रामपंचायती (Gram Panchayat Election) नगरपरिषदांमध्ये सरपंच किंवा नगराध्यक्ष पदासाठी महिला विराजमान आहेत. परंतु अशा बहुतांश ग्रामपंचायती( किंवा नगर परिषद यांचा कारभार महिला पदाधिकारी नावालाच करीत असून सर्व कारभार पतीदेवांच्या हाती असलेल पाहायला मिळत. कोणत्याही निर्णय घेताना आदेशावर स्वाक्षरी करताना पती देवाच्या अनुमतीशिवाय निर्णयात वासही करताना अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

वास्तविक पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे. काही नगरपरिषदांमध्ये व ग्रामपंचायतींमध्ये महिला पदाधिकाऱ्यांना पूर्ण स्वायत्तता दिली आहे. महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीने किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांच्या कारभारात ढवळाढवळ न केल्यास संबंधित संस्था नावारूपास येण्यास वेळ लागणार नाही. असे मत सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी सांगितले.

महिला बचत गटाच्या माध्यमातून आले कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतःचा कारभार पाहणाऱ्या मागणीमुळे संबंधित संस्थेचे कामकाजामध्ये आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून आले आहे. ज्या नगर परिषदेच्या प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेविकेचा कारभार पतीदेव पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. नगरसेवकांना मेयर या नावाने नागरिक आदराने बोलतात मात्र महिला नगरसेविकेच्या पतीलाच मी या नावाने बोलली जाते यावरून कारभार कोण पाहत आहे हे स्पष्ट होत नाही. अशी माहीती भारत अगेन्स्ट करपशन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली.

(Gram Panchayat or Nagar Parishad elections, power of ladies) 

हे सुध्दा वाचा 

मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांविरोधात हेमंत पाटील यांची हायकोर्टात याचिका दाखल

Somewhere rain, somewhere heatwave; Know today’s weather in your state

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी