28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबई'बंजारा व भटक्या विमुक्त वर्गाच्या समस्यांचा शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देऊ'...

‘बंजारा व भटक्या विमुक्त वर्गाच्या समस्यांचा शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देऊ’ नाना पटोले यांचे आश्वासन

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील बंजारा समाज व भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या समाज घटकाला न्याय देण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. काँग्रेस नेहमीच वंचित, पीडित, दलित, मागासवर्गांच्या हिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. भटक्या विमुक्त समाजाच्या समस्यांसदर्भात संबंधित विभागाचे मंत्री यांच्याबरोबर लवकरच एक बैठक घेऊ व हे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole )यांनी दिले आहे. (Nana Patole to give justice to the nomadic society)

टिळक भवन येथे बंजारा व भटक्या विमुक्त समाजाच्या प्रश्नांसंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी खासदार हरिभाऊ राठोड, आमदार राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्यासह समाजाचे राज्यातील (Nana Patole)प्रतिनिधी उपस्थित होते.

'बंजारा व भटक्या विमुक्त वर्गाच्या समस्यांचा शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देऊ' नाना पटोले यांचे आश्वासन

यावेळी बोलताना नाना पटोले (Nana Patole)म्हणाले की, बहुजन समाज आपल्या न्याय हक्कांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. त्यांच्या मागण्या रास्त आहेत, त्या मागण्या सरकारने मंजूर कराव्यात यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशिल आहे. समाजाचा आर्थिक, शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्यासाठी त्या-त्या समाजाला योग्य त्या प्रमाणात निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. या समाज घटकाला न्याय देण्याची आमची भूमिका असून महाविकास आघाडीचे सरकार या मागण्यांना योग्य तो न्याय देईल यासाठी पाठपुरावा करु असे नाना पटोले यांनी सभेत सांगितले.

हे सुध्दा वाचा :- 

After Hardik’s exit, Congress goes all out to woo Naresh Patel

ठाकरे विरूध्द ठाकरे, पुण्यातील सभेतही टीकासत्र सुरूच!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी