25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराष्ट्रीयGujarat Morbi Bridge Collapse : इंग्रजांनी बांधलेला 140 वर्ष जूना पूल भाजप...

Gujarat Morbi Bridge Collapse : इंग्रजांनी बांधलेला 140 वर्ष जूना पूल भाजप सरकारने 5 दिवसांत पाण्यात घातला

रविवारची (ता. 30 ऑक्टोबर) संध्याकाळ ही गुजरातमधील लोकांसाठी अंधारमय संध्याकाळ ठरली. कारण गुजरातमध्ये असलेला मोरबी नदीवरील 140 वर्षे जुना पूल कोसळल्याने या दुर्घटनेत आतापर्यंत 140 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

रविवारची (ता. 30 ऑक्टोबर) संध्याकाळ ही गुजरातमधील लोकांसाठी अंधारमय संध्याकाळ ठरली. कारण गुजरातमध्ये असलेला मोरबी नदीवरील 140 वर्षे जुना पूल कोसळल्याने या दुर्घटनेत आतापर्यंत 140 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच दिवसांपूर्वीच या पुलाचे नूतनीकरण करून हा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. मोरबी जिल्ह्यात असलेल्या मच्छू नदीवर असलेला हा झुलता पूल अचानक कोसळला. दुर्घटना घडली तेव्हा या पुलावर जवळपास 400 ते 500 लोक उपस्थित होते, असे बोलले जात आहे. तर या पुलावर फक्त 100 लोकं एकावेळी उपस्थित राहण्याची क्षमता असल्याची माहिती या पूल दुर्घटनेनंतर समोर आली आहे. हा पूल कोसळल्यानंतर या पुलावरील माणसे ही थेट मच्छू नदीत पडल्याने या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तब्बल 140 वर्षे जुना असलेला हा झुलता पूल गेल्या सहा महिन्यांपासून नूतनीकरणामुळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. गेल्या पाच दिवसांपूर्वीच दिवाळीच्या निमित्ताने हा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. मच्छू नदीवरील हा पूल गुजरातमधील पर्यटनस्थळांपैकी एक होता. ऋषिकेश येथे असलेल्या रॅम-लक्ष्मण या झुलत्या पुलाप्रमाणेच हा पूल देखील होता. त्यामुळे या ठिकाणी कायमच पर्यटकांची गर्दी दिसून येत असे.

दरम्यान, या घटनेनंतर ज्या जिंदाल कंपनीकडून या पुलाची दुरुस्ती करण्यात आली. त्यांच्या या कामावर आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच घटनेनंतर कंपनीवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दुर्घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून दोन लाख रुपये नुकसान बहरपाय जाहीर केली आहे. तसेच या घटनेतील जखमींना 50 हजार रुपये तर गुजरात सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Sherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्रासाठी साजिद खानला यावे लागणार ‘बिग बॉस’च्या बाहेर

वसूलीपायी प्रकल्प घालवले; उद्धव ठाकरेंवर शितल म्हात्रे यांचा आरोप

Kishori Pednekar : किरीट सोमय्यांनी सात दिवसात आरोप सिद्ध करून दाखवावे : किशोरी पेडणेकर

धक्कादायक बाब म्हणजे या झुलत्या पुलाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर या पुलाचे शासनाच्या तीन एजन्सीकडून ऑडिट होणे गरजेचे होते. परंतु हे ऑडिट होऊ न देता दिवाळीसाठी 25 ऑक्टोबरला या पुलाचे उदघाटन करून हा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. या पुलाच्या देखभाल करण्याची जबाबदारी ही सध्या ओधवजी पटेल यांच्या मालकीच्या ओरेवा ग्रुपकडे आहे. ओरेवा ग्रुपनं मोरबी नगरपालिकेसोबत मार्च 2022 ते मार्च 2037 असा 15 वर्षांसाठी करार केला आहे. या कराराच्या आधारे या पुलाची देखभाल, स्वच्छता, सुरक्षा आणि टोल वसुली या सर्व जबाबदाऱ्या ओरेवा ग्रुपकडे आहेत. सहा महिने या पुलाचे नूतनीकरण करताना तब्बल दोन कोटी रुपायंचा खर्च आला. पण आता हा पूल कोसळल्याने या नूतनीकरणावर आणि करण्यात आलेल्या कोटी रुपयांच्या खर्चावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार राहिलेला पूल
मोरबी येथील मच्छू नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाचे बांधकाम हे 1880 साली पूर्ण करण्यात आले होते. त्यावेळी असलेले मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी हा पूल बनविण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च झाले होते. या पुलाच्या बांधकामाचे सर्व साहित्य हे ब्रिटनमधून आणण्यात आले होते. बांधकाम झाल्यापासून ते दुर्घटनेपूर्वीपर्यंत या पुलाची अनेकवेळा डागडुजी देखील करण्यात आली आहे. या पुलाची लांबी 765 फूट होती. तर हा पूल 1.25 मीटर रुंद आणि 230 मीटर लांब होता. हा पूल भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचाही साक्षीदार आहे. हा पूल भारतातील सर्वात जुन्या पुलांपैकी एक होता, त्यामुळे तो पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र होता. या पुलावर जाण्यासाठी 15 रुपयांचं शुल्क सुद्धा आकारले जात होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी