29 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराष्ट्रीयसर्वांत धक्कादायक ! मोदी सरकारच्या काळात 4 लाख भारतीयांनी सोडले नागरिकत्व

सर्वांत धक्कादायक ! मोदी सरकारच्या काळात 4 लाख भारतीयांनी सोडले नागरिकत्व

टीम लय भारी

नवी दिल्ली: आज लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा झाली. यामध्ये भारतीय लोकांनी नागरिकत्व सोडल्याची धक्कादाय माहिती उघड झाली. तीन वर्षांत सुमारे 4 लाख नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. ही आकडेवारी गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सादर केली.

मोदी सरकारच्या काळात 2021 मध्ये सर्वात जास्त भारतीयांनी नागरिकत्व सोडले.तीन वर्षांत तब्बल 3, 92, 643 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले. मंत्री नित्यानंद राय यांच्या आकडेवारीनुसार 20019 मध्ये 144017 तर 2020 मध्ये  85256 आणि  2021मध्ये 163370 नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडले.

भारतीय नागरिकत्व सोडण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये विदेशात नोकरीची संधी असल्याने अनेकजण तिथेच स्थायिक होत आहेत. तसेच भारतातील वाढती लोकसंख्या. भारतात लोकसंख्या जास्त असल्याने होणारी स्पर्धा. ही कारणे आहेत. त्या तुलनेत विदेशात स्पर्धा कमी असल्याने सहज नोकरी लागण्यास मदत होते .

 मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी भारतीयांना ‘अच्छे दिन‘ येणार असे सांगितले होते. तसेच ‘सबका साथ सबका विकास‘ होणार असेही सांगितले होते. मात्र ज्यांना ‘मोदीराज‘ पटले नाही, ते देश सोडून परदेशात कायमचे राहण्यास जात आहेत. याला जबाबदार कोण? परदेशात नोकरी करुन पुन्हा भारतात येणे ठिक वाटते. पण कायमचे देश सोडून जाणे नक्कीच कोणालाही आवडणार नाही. आताच्या पिढीला देशाभिमान वगैरे काहीच राहिलेला नाही. ते देशाला इतके का? कंटाळले याचे उत्तर मोदी सरकारने जनतेला दयावे.

हे सुध्दा वाचा:

‘या‘ माफियांना कोणाचा आशिर्वाद ?

शिवाजीराव आढळराव यांनी फोडले संजय राऊत यांचे बिंग

’उध्दव ठाकरेंनी शरद पवारांची साथ सोडावी’ – रामदास कदम

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!