28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराष्ट्रीयमध्यमवर्गाला अधिक सक्षम बनविणारा अर्थसंकल्प : नरेंद्र मोदी

मध्यमवर्गाला अधिक सक्षम बनविणारा अर्थसंकल्प : नरेंद्र मोदी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा मध्यमवर्गला अधिक सक्षम बनविणारा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. समृद्ध आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ही मध्यमवर्गाकडे आहे. त्यामुळे या वर्गाला सक्षम बनविण्यासाठी आम्ही या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले आहेत, असे मोदी म्हणाले. (A budget that empowers the middle class, Narendra Modi) हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मरगळलेल्या शेअर बाजाराला तेजी आली आहे. या अर्थसंकल्पात कोणत्या विशेष तरतुदी करण्यात येतील याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले होते. सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी प्राप्तिकर द्यावा लागणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यामुळे नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत नरेंद्र मोदी यांनी स्तुती केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मध्यमवर्गाची स्तुती केली आहे. या वर्गाकडे देशाला समृद्ध बनविण्याची ताकद आहे. ते म्हणाले, “देशाच्या मध्यमवर्गात समृद्ध आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आहे. युवा वर्ग ही जशी भारताची ताकद आहे तसा मध्यमवर्ग ही जमेची बाजू आहे. या मध्यमवर्गाला अधिक सक्षम बनवण्यासाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून (Youth and Middleclass is the streanth of India) आमच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. प्राप्तिकर रचना अधिक पारदर्शक केल्यामुळे आता मध्यमवर्गाला आणखी दिलासा मिळणार आहे .”

हे सुद्धा वाचा

Budget 2023 : गुड न्यूज… देशात 740 एकलव्य शाळा अन् 38,800 शिक्षकांची भरती!

Budget 2023 : पॅन कार्ड हे आता राष्ट्रीय ओळखपत्र; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात घोषणा

Budget 2023: अर्थमंत्र्यांच्या भाषणात असतील हे काही खास आर्थिक शब्द, त्यांचा अर्थ जाणून घ्या म्हणजे तुम्हालाही सहज समजेल अर्थसंकल्प

ग्रामीण भागातील लोकांसाठी या अर्थसंकल्पात अनेक प्रोत्साहनपर योजनांची तरतूद करण्यात आली आहे. १२ बलुतेदार तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाला या अर्थसंकल्पात सामावून घेण्यात आले आहे. यामुळे कोट्यवधी ग्रामीण जनतेचा फायदा होणार आहे. सहकारी क्षेत्रासाठी तसेच शेती आणि मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठीदेखील या अर्थसंकलपात चांगल्या योजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक पावले
शहरी आणि ग्रामीण भागातील महिलावर्गाच्या सक्षमीकरणासाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलण्यात आलेली आहेत. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपयांची अभूतपूर्व तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या विकासाला गती प्राप्त होणार असल्याचा आशावाद नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी