28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराष्ट्रीय"आप"चे उमेदवार खाताहेत काँग्रेसचीच मते; भाजपालाही भरभरून मतदान!

“आप”चे उमेदवार खाताहेत काँग्रेसचीच मते; भाजपालाही भरभरून मतदान!

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा प्राथमिक कल पाहता गुजरातेत भाजपाला भरभरून मतदान झाले आहे. तब्बल 52 टक्क्यांहून अधिक मते भाजपाच्या पारड्यात जाताना दिसत आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या वाट्याला 26 टक्के तर "आप"ला 13 टक्के मिळताना दिसत आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा प्राथमिक कल पाहता गुजरातेत भाजपाला भरभरून मतदान झाले आहे. तब्बल 52 टक्क्यांहून अधिक मते भाजपाच्या पारड्यात जाताना दिसत आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या वाट्याला 26 टक्के तर “आप”ला 13 टक्के मिळताना दिसत आहे. “आप”चे उमेदवार काँग्रेसच्या वाट्याचीच सर्वाधिक मते खाताना दिसत आहेत.

गुजरातेत सलग सातव्या वेळी सत्ता प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करणारा भाजप आता पश्चिम बंगालमधील डाव्यांच्या विक्रमाशी बरोबरी साधणार आहे. अर्थात किती ठिकाणी आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी मते खाऊन काँग्रेस उमेदवार पाडण्याची कामगिरी केली, ते अंतिम निकालात स्पष्ट होईल. मात्र, तूर्तास प्राथमिक कलात तरी भाजपाचा मत विभाजनाचा “करेक्ट कार्यक्रम” साध्य होताना दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

गुजरात निवडणूक : भाजपाची 150 जागांवर आघाडी

विधानसभा निवडणूक निकाल : गुजरातमध्ये भाजपची आघाडी; हिमाचलात काट्याची टक्कर

भारतानं मालिका गमावली पण कर्णधार रोहितनं ‘दिल खुश कर दिया !’

गुजरातसह संपूर्ण देशात आता भाजप कार्यकर्ते विजयोत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहेत. काल आपच्या झाडूने भाजपाला दिल्लीतून साफ केल्यानंतर हिरमुसलेले, गायब झालेले भाजपचे नेते, कार्यकर्ते आता सोशल मीडियात अवतरू लागले आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप बहुमताचा आकडा सहज पार करताना दिसत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

भाजपाच्या यशाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षित गुजरात! गेल्या 20 वर्षांत येथे एकही मोठी दंगल किंवा दहशतवादी हल्ला झालेला नाही. भाजपच्या हाती राज्याचे भविष्य सुरक्षित असल्याचा गुजराती जनतेचा विश्वास कायम दिसून येत आहे.

गुजरातमधील जनतेने आपला चांगली मते दिली आहेत. त्यावरून आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय पक्ष बनत असल्याचे दिसते, असे पक्षाचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. आरोग्य आणि शिक्षणाला पक्षाने महत्त्व दिले. जनहिताच्या या राजकीय ध्येयास आता प्रथमच राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त होत आहे. त्याबद्दल संपूर्ण देशाचे अभिनंदन, असे ट्विट त्यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी