भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या सरळसोट स्वभावामुळे आणि निरंतर विकासकामांमध्ये व्यस्त असतात त्याबद्दल त्यांचे देशभरात कौतुकही होते. मात्र दिल्लीत त्यांचे खच्चीकरण केले जात असल्याच्या चर्चा वारंवार ऐकायला मिळतात. मात्र दिल्लीतील शहा, शहंशहांना नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही हे दाखवून दिल्याचे म्हणत भाजपचे माजी आमदार आणि लोकसंग्रामचे नेते अनिल गोटे यांनी कौतुक केले आहे.
अनिल गोटे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून अनेकांनी संघटना काढल्या, पक्षही काढले. पण त्याचवेळी दिल्लीच्या तख्तापुढे रिकाम्या हाताने तीन वेळा मुजरा घालुन त्यांच्या स्वाभिमानाची व्याख्या निश्चित केली. तब्बल साडे तीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्रातील दिग्गज सरदार हल्ली दिल्लीपुढे उन्नीसाद घातल्याची असंख्य उदाहरणे आहेत.
स्वाभिमानाची पहिली ओळख सबंध जगाला तब्बल साडे तीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्राच्याच मातीत जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाच्या दरबारात झुकण्यास नकार देऊन मुघलांना त्यांची जागा दाखवून दिली. माननीय नितीन गडकरी साहेबांनी तब्बल साडे तीनशे वर्षानंतर शहा आणि शहंशहा या दोघांनाही समजेल अशा आपल्या कृतीतून महाराष्ट्र म्हणजे काय ? आणि स्वाभिमान कशाला म्हणतात हे दाखवत ‘झुकेगा नही साला !’ हा पुष्पा सिनेमातील डॉयलॉग प्रत्यक्ष अंमलात आणला, असे गोटे यांनी म्हटले आहे.
अनिल गोटे म्हणतात, भलेही शंहशहाच्या हुजऱ्यांना घडलेल्या प्रसंगाचे विशेष वाटणार नाही. वाटतही नसेल. पण महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची मान खऱ्या स्वाभिमानाने माननीय नितीनजींनी स्वाभिमानाने ताट केली आहे. त्यांनी आजतागायत स्वाभिमान शब्द वापरुन झिजलेल्या नाण्यासारख्या गुळगुळीत झालेल्या शब्दांमध्ये जान आणली.
गोटे म्हणाले, हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आज असते तर, त्यांनी नितीजींना कडकडून मिठी मारली असती. स्वर्गीय बाळासाहेबांच्या बद्दल माझ्या हृदयात अपार श्रध्दा आणि नितांत आदर आहे. तो केवळ स्वर्गीय बाळासाहेब, श्रीमती इंदिरा गांधी, असोत, राजीव गांधी. असोत कुणीही असो. पण कधीही आयुष्यात दिल्ली स्वरांपुढे जाऊन हात जोडले नाही.
हे सुद्धा वाचा
शरद पवारांच्या मदतीला उद्धव ठाकरे धावले !
प्रकाश आंबेडकरांचा ‘इंडिया’त समावेश होणार का ?, उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे संकेत
भावाचा जीव वाचवण्यासाठी बहिणीकडून स्वतःची किडनी भेट
मातोश्री दिल्लीला कधीही गेली नाही. पण दिल्लीच्या तख्ताने मातोश्रीच्या पायऱ्यांवर लोटांगण घातले आहे. मग राष्ट्रपतीची निवडणुक असो, की आणखी कोणतेही कारण असो. पण दिल्लीच्या दिग्गजांनी मातोश्रीतील पांडुरंगापुढे माथे टेकले आहेत. शतकानुशतके छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर माननीय नितीन गडकरी साहेबांचे नाव घेतलेच जाईल, असे अनिल गोटेंनी म्हटले आहे.