33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeराष्ट्रीयदेशातील काही न्यूज पोर्टल्स आणि काही परदेशी माध्यमे भारतीय विचार आणि समाजाविरोधात...

देशातील काही न्यूज पोर्टल्स आणि काही परदेशी माध्यमे भारतीय विचार आणि समाजाविरोधात प्रोपगंडा चालवत आहेत; अनुराग ठाकुर यांचा आरोप

ज्या विदेशी माध्यमांचा भारताप्रती घृणास्पद इतिहास आहे अशा विदेशी माध्यम कंपन्यांमधील जे पत्रकार भारताबद्दल खोटे लिखान करत आहेत, ते अधिकतर भारतीय वंशाचे असतात. त्यांची प्रोफाईल जर तुम्ही धुंडाळली तर माहिती पडेल की, त्यांच्यात खासकरुन हिंदूंबाबत घृणा आहे आणि ते एकांगी बातम्या देतात. आपल्याला हे मान्य करावे लागेल की, काही परदेशी माध्यम संस्था आणि देशातील काही न्यूज पोर्टल्स भारतीय विचार आणि समाजाच्या विरोधात प्रोपगंडा चालवत आहेत आणि हे स्पष्ट सांगण्यासाठी कोणालाच संकोच वाटू नये, असा आरोप केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी केले.

मंत्री अनुराग ठाकुर यांनी विदेशी माध्यमांच्या भारतातील हस्तक्षेपाबाबत बोलताना सांगितले की, भारताची वाढती प्रगती काही विदेशी शक्तींना पचत नाही, मात्र कोणते विदेशी माध्यम भारतीय न्यायव्यवस्थेपेक्षा मोठे नाही. त्यामुळे संविधानिक संस्थांच्या कार्यप्रणालीतील हस्तक्षेप आम्ही सहन करणार नाही.

मंत्री ठाकुर यांनी नव्या भारताबद्दल बोलताना सांगितले की, आज भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खुप गतीने पुढे जात आहे. नरेंद्र मोदी हे ७६ टक्के ग्लोबल अप्रुवल रेटींगसह सर्वात लोकप्रिय नेता आहेत. भारताची वाढती प्रगती काही विदेशी शक्तींना बघवत नाही. काही विदेशी माध्यमे अजेंडा आणि प्रोपगंडा चालवून भारताला बदनाम करत आहेत. मात्र विदेशी माध्यमे भारताची दिशा ठरवू शकत नाहीत. आज ना भारतात ज्ञानाची कमी आहे ना डिजिटल कमतरता आहे, ना टेक्नोलॉजीची कमतरता आहे. आज भारताकडे सगळे काही आहे, जे विकसित देशांकडे असते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज भारताकडे एक राष्ट्रवादी विचारांचे, समाजाला जोडणारे असे सरकार आहे. जे भारताला विश्वगुरु बनविण्यासाठी सक्षम आहे.

मंत्री ठाकुर यांनी यावेळी विदेशी माध्यमांच्या भारतातील हस्तक्षेपाबद्दल तिखट प्रतिक्रीया देताना सांगितले की, आज भारतात असे अनेक विदेशी माध्यमे आहेत, जी भारत विरोधी विचारांचे काम करत आहेत. त्यांनी असे काही परस्परसंबंध जोडून ठेवले आहेत की, आपल्या गैरकारभाराबाबत सरकारने चौकशी केली तर ओरड करतात आणि जगभरात भारतात माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आल्याचे सांगतात. ते आपच्या गैरकारभारावर माध्यम नावाची चादर झाकू पाहत आहेत. याच गैरभावनेतून ती माध्यमे मनगढंत अहवाल काढतात ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नसतो.  देशातील माध्यमांनी अशा विदेशी माध्यमांना आपल्या देशाबाबत असे चित्र उभा करण्याची संधी देऊ नये असे देखील अनुराग ठाकुर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, विदेशी माध्यमे ज्या पध्दतीने सिलेक्टिव्ह होऊन भारतातील बातम्या चुकीच्या पद्धतीने दाखवून सनसनाटी निर्मान करत आहे, मग आमची माध्यमे त्यांच्या देशातील बातम्यांना अशा पद्धतीने दाखवतात का? असा सवाल देखील त्यांनी केला. ते म्हणाले अनेरिकेत गोळीबाराच्या घटना आज मोठ्या प्रमाणात होत आहे. पण यावर भारत अथवा जागतिक स्तरावर चर्चा झाल्याचे पाहिले आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा
भारतीय पोस्ट ऑफिसची लखपती करणारी ‘ग्रामसुरक्षा योजना’
महाराष्ट्रात या अन् महापुरुषांना शिव्या घाला; जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका
‘धनगड’ की ‘धनगर’ समाज? 10 एप्रिलला होणार अंतिम सुनावणी

पाश्चात्य वर्चस्ववाद आणि जागतिक माहिती क्रमवारीबर देखील अनुराग ठाकुर यांनी लक्ष वेधले, ते म्हणाले तुम्हाला फायझर लस आठवत असेल, ती भारतात आणण्यासाठी कायकाय कारस्थाने केली, स्वदेशी लसीच्या विरोधात कसा प्रोपगंडा चालवला. हे सगळं माहितीचा रतीब आणि पाश्चात्य वर्चस्वाद आहे. आपल्या सर्वांना तो मोडून काढावा लागेल. आपला भारत जोपर्यंत आपला माहितीचा प्रवाह आपल्या हातात घेत नाही तोपर्यंत तो विश्वगुरू बनू शकत नाही असे अनुराग ठाकुर म्हणाले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी