28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराष्ट्रीयआमचे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य, परिस्थिती शांत होईल अशी आशा करतो; बीबीसीची पहिली...

आमचे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य, परिस्थिती शांत होईल अशी आशा करतो; बीबीसीची पहिली प्रतिक्रीया

बीबीसी (BBC) या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या दिल्ली (Delhi) आणि मुंबईतील (Mumbai) कार्यालयांवर आयकर विभागाने (Income Tax Department) मंगळवारी छापेमारी (raid) केली. त्यानंतर देशासह जगभरात या बातमीने खळबळ उडाली. विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. कांग्रेसने ही कारवाई अघोषीत आणिबाणी असल्याचे म्हटले, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यांच्या कार्यालयावर धाड घालणे, ही कोणती लोकशाही असा सवाल करत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. दरम्यान बीबीसीने या प्रकरणी ट्विट करत पहिली प्रतिक्रीया दिली आहे. (BBC Income Tax raid BBC first reaction On IT Raid)

बीबीसीने ट्विटकरत म्हटले आहे की, बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात सध्या आयकर विभागाचे अधिकारी असून आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत. ही परिस्थिती लवकरात लवकर निवळेल अशी आशा असल्याचे देखील बीबीसीने ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान बीबीसीवरील छाप्याबद्दल आयकर विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. आयकर विभागाने म्हटले आहे की, बीबीसीने छापे घातलेले नसून दिल्ली आणि मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

हे कोणत्या लोकशाहीत बसते?, बीबीसीवरील धाडीवर उद्धव ठाकरे संतापले!

बीबीसी कार्यालयांवर झालेल्या आयकर विभागाच्या छापेमारीमागे मोदींचा हात?

द मोदी क्वेश्चन : आयटी कायदा आणीबाणीतील अधिकार वापरुन केंद्राने बीबीसी डॉक्युमेंटरी केली ब्लॉक

काही दिवसांपूर्वी बीबीसीने इंडिया : द मोदी क्वेश्चन नावाची 2002 गुजरात दंगलीवर आधारीत एक डॉक्युमेंट्री प्रसारित केली होती. या डॉक्युमेंट्रीवर केंद्र सरकारने भारतात बंदी घातली. तसेच युट्यूबवरुन देखील ती हटविण्यात आली. त्यानंतर विरोधी पक्षांनी, संघटनांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी