34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयGhulam Nabi Azad Resigns : देशात काँग्रेसला मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसला...

Ghulam Nabi Azad Resigns : देशात काँग्रेसला मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसला रामराम

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तर देशात देखील काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्ष कमकुवत झालेला पाहायला मिळत आहे. पण आता काँग्रेसच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसला रामराम केला आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तर देशात देखील काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्ष कमकुवत झालेला पाहायला मिळत आहे. पण आता काँग्रेसच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसला रामराम केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज (ता. 26 ऑगस्ट) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासोबतच त्यांना पक्षाकडून देण्यात आलेल्या इतर पदांचा देखील राजीनामा (Ghulam Nabi Azad Resigns) दिलेला आहे. याआधी सुद्धा गुलाम नबी आझाद यांनी त्यांना पक्षाकडून देण्यात आलेल्या जम्मू-काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या अध्यक्ष पदाचादेखील राजीनामा दिला होता. महत्वाची बाब म्हणजे पक्षाकडून त्यांची त्यावेळी त्या पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत काही तासांतच पदाचा राजीनामा दिला होता.

काँग्रेस पक्षाला ज्येष्ठ नेतेच सोडून जात असल्याने भविष्यात काँग्रेस पक्षाला खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गुलाम नबी आझाद यांच्याआधी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर नाराज होऊन पक्ष सोडल्याचे त्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पात्रात म्हंटले आहे.

गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना पाच पानांचे राजीनामा पात्र लिहून पाठवेल आहे. या पत्रात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचे माझं 50 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढावी,’ असा सल्ला या पात्राच्या माध्यमातून गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी आणि पक्षाला दिला आहे.

हे सुद्धा वाचा

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी संपेनात, निवडणूक पत्रावरून होणार चौकशी

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी भाजपची नवी खेळी

Maharashtra Assembly Sesssion : एकनाथ शिंदे यांची खेळी, विधिमंडळ सभागृहात बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र !

राहुल गांधी यांच्यावर गुलाम नबी आझाद यांनी या पत्राच्या मध्यमातून हल्ला चढवला आहे. ‘तुमच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगली कामगिरी करत आहे. पण दुर्दैवाने राहुल गांधी यांचा पक्षप्रवेश झाल्यापासून, विशेषत: 2013 नंतर तुम्ही राहुल यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर, त्यांनी पक्षातील चर्चेची संपूर्ण ब्लू प्रिंटच उद्ध्वस्त करुन टाकली आहे. सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला करण्यात आलं. तर अननुभवी नेते पक्षाचा कारभार पाहू लागले.’ असे गुलाम नबी आझाद यांच्याकडून या पात्रात लिहिण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे काँग्रेस पक्षावर तीव्र नाराज असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसला यामुळे आणखी किती धक्के सहन करावे लागतात ? हे पाहावे लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी