29 C
Mumbai
Wednesday, August 9, 2023
घरराष्ट्रीयराहूल गांधी यांनी फ्लाइंग किस देताना मी पाहिले नाही; भाजपच्या खासदार हेमा...

राहूल गांधी यांनी फ्लाइंग किस देताना मी पाहिले नाही; भाजपच्या खासदार हेमा मालिनी

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे, या प्रवस्तावावर आज राहुल गांधी यांनी लोकसभेत जोरदार भाषण केले. मात्र या भाषणादरम्यान राहूल गांधी यांनी फ्लाईंग किस केल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला असून या मुद्द्यावरुन आता राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. स्मृती इराणी यांनी राहूल गांधी यांच्यावर कठोर टीका केली आहे.

याच मुद्द्यावरुन भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांना पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या राहूल गांधी यांनी फ्लाईंग किस देताना मी पाहिले नाही. मात्र राहूल गांधी यांचे काही शब्द योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या.

राहूल गांधी यांनी आज लोकसभेत भाषण करताना पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु होती. याच दरम्यान राहूल गांधी यांचे हातवारे पाहून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहूल गांधी यांनी फ्लाईंग किस केल्याचा आरोप केला आहे. या मुद्दयावरुन सत्ताधारी पक्षातील महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना वायनाडचे खासदार राहूल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सत्ताधारी पक्षातील महिला खासदारांनी ओम बिर्ला यांना दिलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावर काही महिला खासदारांच्या सह्या असून त्यामध्ये खासदार हेमा मालिनी यांची देखील सही असल्याचे दिसून येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या माजी खासगी सचिवाला यूएलसीआर घोटाळाप्रकरणी ईडीकडून समन्स

महात्मा फुले अभ्यासक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दिवा स्टेशनमध्ये मोटरमनच्या केबिनमध्येच चढून महिलेनेच रोखून धरली लोकल

राहूल गांधी यांचे मोदी आडनाव बदनामी प्रकरणी लोकसभा सदस्यत्त्व रद्द झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांचे सदस्यत्व पून्हा बहाल करण्यात आले आहे. सदस्यत्व पून्हा बहाल झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राहूल गांधी यांनी लोकसभेत भाषण केले. यावेळी मणिपूरच्या मुदद्यावरुन राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. याच भाषणादरम्यान त्यांच्यावर फ्लाईंग किसचा आरोप करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी