29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराष्ट्रीयगुजरात : भाजप मोडणार सर्वाधिक जागांचा विक्रम, तर काँग्रेसचाही सर्वात कमी जागांचा...

गुजरात : भाजप मोडणार सर्वाधिक जागांचा विक्रम, तर काँग्रेसचाही सर्वात कमी जागांचा विक्रम होणार!

गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचे प्राथमिक कल आता त्याच पद्धतीने निकालात बदलताना दिसत आहेत. भाजप आता थेट 160चा आकडा ओलांडताना दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा मिळविण्याचा काँग्रेसचा विक्रम मोडणार असल्याचे दिसतेय.

गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचे प्राथमिक कल आता त्याच पद्धतीने निकालात बदलताना दिसत आहेत. भाजप आता थेट 160चा आकडा ओलांडताना दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा मिळविण्याचा काँग्रेसचा विक्रम मोडणार असल्याचे दिसतेय. दुसरीकडे, काँग्रेसचाही सर्वात कमी जागांवर विजयी होण्याचा विक्रम होणार आहे.

गुजरात विधानसभेच्या एकूण 182 जागांपैकी भाजप आता 151 जागांवर आघाडीवर आहे. यावेळी गुजरातची निवडणूक भाजपसाठी विक्रमी ठरणार आहे. 2002 मध्ये भाजपला सर्वोच्च 127 जागा मिळाल्या होत्या. त्यापूर्वी काँग्रेसला 1980 मध्ये 141 आणि 1985 मध्ये 149 जागा मिळाल्या होत्या. 1985 चा गुजरातमधील कोणत्याही पक्षाचा विक्रमी विजय काँग्रेसच्या नावे आहे. तो भाजप मोडतो का, हे पाहणे आता औत्सुक्याचे आहे. याशिवाय, राज्यात काँग्रेसची आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी 1990 मध्ये होती. त्यावेळी पक्षाचे फक्त 33 आमदार निवडून आले होते. यावेळी काँग्रेसची कामगिरी त्याहून खालावते की काय, अशी स्थिती आहे.

हे सुद्धा वाचा

हिमाचल प्रदेशात काँग्रेसने ओलांडला बहुमताचा टप्पा; भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका!

क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा पिछाडीवर; जाणून घ्या गुजरातचे लेटेस्ट अपडेट्स कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर

“आप”चे उमेदवार खाताहेत काँग्रेसचीच मते; भाजपालाही भरभरून मतदान!

काँग्रेसच्या अनेक बालेकिल्ल्यात आता भाजप आघाडीवर आहे. अमरेली आणि मोरबी सारख्या जिल्ह्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे, गेल्या वेळी काँग्रेसने इथे जोरदार मुसंडी मारली होती. काम करायचे असेल तर आपण सत्ताधारी पक्षात असावे, ही प्रबळ भावना राज्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यात होती. स्वतः अमित शाह व आरसी पटेल यांनी तळ ठोकून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना भाजपमध्ये खेचून आणले. कार्यकर्त्यांची बांधलेली मोट भाजपला ऐतिहासिक विजयाकडे घेऊन जाताना दिसत आहे. शाह-पाटील यांचे नियोजन आणि पंतप्रधान मोदी यांचा एकहाती प्रचार, हे समीकरण भाजपला फायद्याचे ठरताना दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी