जम्मूमधील (Jammu) नरवाल परिसरात शनिवारी (दि. २०) रोजी सकाळी ११ आणि ११.३० वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी एका पाठोपाठ एक असे दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट (bomb blasts) घडवून आणले. या स्फोटात सात जण जखमी (injured Seven people) झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्व जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुरक्षा यंत्रणा सतर्क (Security alert) झाल्या आहेत. (bomb blasts in Jammu were injured Seven people Security alert)
दरम्यान पोलिसांनी या संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली असून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या हल्ल्यात सोहेल कुमार (वय ३५), सुशील कुमार (२५) विशप प्रताप (५२), विनोद कुमार (२५), अरुण कुमार (४०) अमित कुमार आणि राजेश कुमार हे जखमी झाले आहेत. नरवाल परिसरातील ट्रान्सपोर्ट नगरच्या यार्ड नंबर सात आणि नऊ मध्ये हे बॉम्बस्फोट झाले आहेत. दरम्यान पोलिस प्रशासनाने या परिसरात सुरक्षाव्यवस्था कडक केली असून पोलिस घटनास्थळावरील वाहने हटवत आहेत.
हे सुद्धा वाचा
मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीसांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट
रेमडिसिवीर खरेदी प्रकरणात बीएमसीला क्लीन चिट
Google च्या जगभरातील १२,००० कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड
प्रजासत्ताक दिन अवघ्या पाच दिवसांवर असून सध्या राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा देखील जम्मू काश्मिरमध्ये आहे. त्या पार्श्वभूमिवर जम्मू काश्मिरमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क असताना दहशतवाद्यांनी हा बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून या घातपाताचा आता कसून तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी आणि शेरवॉन कंपनीच्या कारचा बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी वापर केला. हे दोन्ही बॉम्बस्फोट अर्ध्या तासाच्या अंतराने घडवून आणले. या घटनेनंतर सीआरपीएफ, सैन्यदल, तसेच जम्मू काश्मिर पोलीस सतर्क झाले आहेत.