34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयमहिला डॉक्टरची हत्या करून आत्महत्या करण्याचा तरुणाचा प्रयत्न; जम्मूतील धक्कादायक घटना उघडकीस

महिला डॉक्टरची हत्या करून आत्महत्या करण्याचा तरुणाचा प्रयत्न; जम्मूतील धक्कादायक घटना उघडकीस

जम्मूमधून महिला डॉक्टरची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. होळीच्या सणासाठी येथे आलेल्या मैत्रिणीची (महिला डॉक्टर) तिच्या प्रियकराने चाकू भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी प्रियकरानेही पोटात वार करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

जम्मूमधून महिला डॉक्टरची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. होळीच्या सणासाठी येथे आलेल्या मैत्रिणीची (महिला डॉक्टर) तिच्या प्रियकराने चाकू भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी प्रियकरानेही पोटात वार करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या आरोपी प्रियकरावर जम्मू येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी मृत महिला डॉक्टरचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.

काय आहे प्रकरण
पोलिसांनी मृत महिला डॉक्टरची ओळख सुमेधा शर्मा अशी केली असून ती जम्मूतील तालब टिल्लो येथील रहिवासी आहे. त्याचवेळी जोहर मेहमूद गनी असे आरोपीचे नाव असून तो पंपोश कॉलनी येथील रहिवासी आहे. हा प्रकार उघडकीस आला जेव्हा आरोपी जोहरच्या नातेवाईकाने पोलिसांना माहिती दिली की जोहरने काही वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या करणार असल्याचे फेसबुकवर पोस्ट केले होते. माहिती मिळताच पोलीस जम्मूतील जानीपूर येथील जोहरच्या घरी गेले. घराचे गेट बंद होते, त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सुमेधाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आरोपी जोहरच्या पोटात दुखापत झाली आहे. दोघांनाही पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र सुमेधाचा जीव वाचू शकला नाही. त्याचबरोबर आरोपी जोहरची प्रकृती चिंताजनक आहे.

हे सुद्धा वाचा

नात्याला काळिमा : सासरच्यांनी केले अमानुष कृत्य; सुनेचे हातपाय बांधून मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार

“तिच्यासारखं सुंदर दिसण्यापेक्षा…” पाहा काय म्हणतेय तेजश्री प्रधान

कोरोना नंतर आता इन्फ्लुएंझा व्हायरसचा धोका वाढला! भारतात दोघांचा मृत्यू

सुमेधा 7 मार्चला होळीसाठी घरी आली होती आणि तिचा प्रियकर जोहरच्या घरी थांबली होती. दोघांमध्ये कथितरित्या भांडण झाले, त्यानंतर आरोपी जोहरने तिच्यावर चाकूने वार केले. सध्या आरोपी जोहर आणि सुमेधा यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जोहर मेहमूद घनी आणि मृत सुमेधा यांचे 4 वर्षांहून अधिक काळ संबंध होते आणि त्यांनी जम्मूतील एका दंत महाविद्यालयात बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस) चे शिक्षण घेतले होते. यानंतर सुमेधा एमडीएसचे शिक्षण घेण्यासाठी जम्मूच्या बाहेर गेली. दुसरीकडे, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 302 (हत्या) नुसार गुन्हा दाखल केला असून या संदर्भात तपास सुरू केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी