27 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराष्ट्रीयचिकन टिक्का मसालाचा शोध लावणारे अहमद अस्लम अली यांचे निधन

चिकन टिक्का मसालाचा शोध लावणारे अहमद अस्लम अली यांचे निधन

चिकन टिक्का मसालाचा (Chicken Tikka Masala) शोध लावणारे मुळचे पाकिस्तानचे अहमद अस्लम अली (Ahmad Aslam Ali) यांचे (वय ७७) निधन झाले. चिकन टिक्का मसाला हे ब्रिटनसह जगभरात खवय्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. अस्लम यांच्या स्कॉटलंड मधील ग्लासगो येथील शीश महल या रेस्टोरंटच्या फेसबुक पेजवर त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली. हे रेस्टॉरंट त्यांनी 1964मध्ये सुरू केले होते.

अहमद अस्लम यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी 1970 च्या दशकात एका ग्राहकाच्या तक्रारीमुळे पहिल्यांदा चिकन टिक्का मसाला बनविला होता. चिकन टिक्का मसाला पहिल्यांदा त्यांच्याच रेस्टोरंटमध्ये बनवला होता. त्यवेळी ग्राहकाने चिकन टिक्का खाताना तो खुपच सुका असल्याचे सांगत सॉसची ऑर्डर दिली होती. त्यानंतर त्यांनी असा विचार केला की, आपण चिकन सॉस सोबत बनवू त्यामुळे त्यांनी चिकन टिक्का सॉस सोबत बनविले. चिकन टिक्का मसालामध्ये दही, क्रिम आणि मसाले वापरले जातात. यातूनच चिकन टिक्का मसालाचा शोध लागल्याचे त्यांनी सांगितले होते. चिकन टिक्का मसाला पाहता पाहत ब्रिटिश रेस्टोरंटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय झाली.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान मोदी यांचे नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन

VIDEO : पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार

अब्दुल सत्तारांकडून कृषी अधिकाऱ्यांची सालगड्यागत अवस्था; संपूर्ण कृषी खाते कृषिमंत्र्यांच्या दावणीला!

अहमद अस्लम अली म्हणाले होते की, आम्ही चिकन टिक्का मसाला ग्राहकाच्या चवीच्या आवडीनुसार तयार करतो. सर्वसाधारणपणे ग्राहक गरम करी घेत नाहीत. त्यामुळे आम्ही दही आणि क्रीम सोबत चिकट टिक्का तयार करतो. चिकन टिक्का मसालाला संरक्षित दर्जा देण्याबाबत ब्रटनमध्ये अभियान देखील चालवले गेले होते. माजी परराष्ट्र मंत्री रॉबिन कुक यांनी एकदा चिकन टिक्का मसाला डिश ला ब्रिटीश संस्कृतिचा महत्त्वपूर्ण हिस्सा असल्याचे सांगितले होते.
अहमद अस्लम अली हे मुळचे पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील होते. 1964 मध्ये ग्लॉसगो येथे शीश महल नावाचे रेस्टॉरंट त्यांनी सुरू केले. अली यांच्या मागे आता त्यांच्या पत्नी तीन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी