28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराष्ट्रीयGhulam Nabi Azad : काँग्रेसचे निर्णय राहुल गांधी घेत नाहीत; गुलाम नबी...

Ghulam Nabi Azad : काँग्रेसचे निर्णय राहुल गांधी घेत नाहीत; गुलाम नबी आझाद यांचा खुलासा

गुलाम नबी आझाद यांच्याकडून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचे पत्र लिहिण्यात आले आहे. या पात्रातून त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात थेट नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाला अखेरचा रामराम केला आहे. काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नाराज होऊन गुलाम नबी आझाद यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह इतर सर्व पदांचा देखील राजीनामा दिला. गुलाम नबी आझाद यांच्याकडून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचे पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रातून त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात थेट नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. पक्षाचे निर्णय हे राहुल गांधी यांचे सेक्रेटरी आणि सुरक्षा रक्षक घेत आहेत. याशिवाय राहुल गांधी हे स्वतःच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करत असल्याचा आरोप गुलाम नबी आझाद यांच्याकडून करण्यात आला आहे.

‘अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचं माझं 50 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रा काढण्यापूर्वी ‘काँग्रेस जोडो यात्रा’ काढावी.’ असे गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे. तसेच राहुल गांधी हे पक्षातील कोणत्याही ज्येष्ठ नेत्याचा आदर करत नाही, उलट त्यांच्याकडून ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करण्यात येत असल्याचा धक्कादायक खुलासा गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.

राहुल गांधी यांच्यावर गुलाम नबी आझाद यांनी या पत्राच्या मध्यमातून हल्ला चढवला आहे. ‘तुमच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगली कामगिरी करत आहे. पण दुर्दैवाने राहुल गांधी यांचा पक्षप्रवेश झाल्यापासून, विशेषत: 2013 नंतर तुम्ही राहुल यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर, त्यांनी पक्षातील चर्चेची संपूर्ण ब्लू प्रिंटच उद्ध्वस्त करुन टाकली आहे. सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला करण्यात आलं. तर अननुभवी नेते पक्षाचा कारभार पाहू लागले.’ असे गुलाम नबी आझाद यांच्याकडून या पात्रात लिहिण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

Ghulam Nabi Azad Resigns : देशात काँग्रेसला मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसला रामराम

BMC Election 2022 : मनसेने महानगरपालिका निवडणुकीसाठी कसली कंबर

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा पुढचा ‘टार्गेट’ आदित्य ठाकरे?

काँग्रेस पक्षाचे महत्वपूर्ण निर्णय हे राहुल गांधी यांनी घेणे अपेक्षित आहे किंवा हे निर्णय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून अथवा वर्किंग कमिटीकडून घेण्यात येत असतात. परंतु हे निर्णयचक्क राहुल गांधी यांचे पीए आणि सुरक्षा रक्षक घेत आहेत, असा धक्कादायक खुलासा गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. दरम्यान, पक्षातील वरिष्ठ नेत्यांना पक्षासंबंधी घेण्यात येणाऱ्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला केले जात आहे, ज्यामुळे वरिष्ठ नेत्यांचा अपमान होत असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी पत्रातून म्हंटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी