33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयदेशाच्या हवामानात मोठा बिघाड

देशाच्या हवामानात मोठा बिघाड

टीम लय भारी

मुंबई : देशाच्या हवामानात मोठा बिघाड झाला आहे. जून महिना संपत आला तरी पुरेशा पावसाचे आगमन झाले नाही. राज्यातील विविध भागात केवळ मान्सुन पूर्व पाऊस कोसळला. भारतीय हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत केले होते. 25 मे ला पावसाला सुरुवात होईल असे सांगितले होते. मात्र 1 महिना उलटला तरी देखील पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरला आहे. केवळ मागच्या दोन वर्षांत झालेल्या तोक्ते आणि निसर्ग वादळाचे भाकीत खरे ठरले होते. त्यामुळे यंदाही ते खरे ठरेल असे नागरिकांना वाटत होते. त्यामुळे पेरणीची तयारी करुन बसलेल्या बळीराजाचा अपेक्षा भंग झाला आहे.

देशातील हवामान अनेक अर्थाने खराब झाले आहे. अग्निपथ योजनेनंतर देशात केंद्र सरकार विरोधात असंतोषाची लाट उसळली होती. आता तर महाराष्ट्र सरकारच्या अस्तित्वाची लढाई सुरु आहे. त्यामुळे बंडखोर आमदार राज्या बाहेर आहेत. त्यात कृषी मंत्री आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेला कृषी विषय मार्गदर्शन करणे, शेतमाल विक्री प्रक्रिया, बी आणि खत खरेदी विक्री प्रक्रिया ठप्प झाली आहे. बळीराजाला कोणी वाली उरलेला नाही. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपले आहे.

आशा वेळी राज्य सरकारची यंत्रणाच ठप्प झाली आहे. त्यात ऐन पावसाळ्यात पाणीबाणीचे संकट आले आहे. मुंबईमध्ये पाणी कपातीचे आदेश देण्यात आले आहेत. धरणांनी तळ गाठला आहे. महानगरांची ही परिस्थिती आहे. तर मग खेडे गावातील परिस्थिती काय असेल? यंदा जुलै महिन्यात देखील पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

बंडखोरांची 11 जुलैपर्यंत वाढली धडधड

भाजप कार्यकर्त्यांचे स्वप्न भंगले, विठ्ठलाच्या महापुजेचा मान उद्धव ठाकरेंकडेच !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी