32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराष्ट्रीयShiv Sena Split : दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली

Shiv Sena Split : दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली

'शिवसना' आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठविल्यामुळे उद्धव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली आहे.

‘शिवसना’ आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठविल्यामुळे उद्धव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली आहे. या सुनावणीला निवडणूक आयोगालादेखील आपले म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने निर्देश दिले होते. तसेच ठाकरे यांच्यावतीने देखील यावेळी न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. दरम्यान याप्रकरणावर केंद्रीय निवडणूक आयोगाने तातडीने निर्णय घ्यावेत, असे आदेश देखील दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.

या याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसना’ आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठविल्याचा निर्णय हा बेकायदेशीर होता असा दावा केला होता. यावर उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षावरील दावा कायम असून निवडणूक आयोगाने याबाबत अद्याप देखील कोणताही अतिंम निर्णय घेतलेला नाही. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने लक्ष घालावे, आणि उद्धव ठाकरेंकडून आयोगाकडे पक्षाच्या दाव्याबाबत सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि पुराव्यांची दखल घ्यावी असे निर्देश आम्ही देऊ शकतो, असे न्यायालयाने यावेळी म्हटले. याबाबतची सुनावणी न्यायमुर्ती संजीव नरूला यांच्या समोर पार पडली.

उद्धव ठाकरे यांच्या बाजूने म्हटले होते की, केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रथमदर्शनी जे दिसत आहे त्यावरच निकाल दिला आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठविता येणार नाही, गेली 30 वर्षांपासून मी पक्ष चालवत आहे. अशी बाजू उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर पक्षात मोठी फुट पडली, जवळपास 40 आमदार आणि 12 खासदार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर देखील अनेकांनी शिंदे गटाची वाट धरली. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. तसेच त्यांनी निवडणूक आयोगाकडे देखील शिवसेना पक्षावर आपला दावा सांगितला आहे. शिवसेना पक्ष कुणाचा याबाबत सध्या निवडणूक आयोगाकडे सुणावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पुरावे सादर कऱण्यास सांगितले असून दोन्ही गटाकडून शपथपत्रे, कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत.
हे सुद्धा वाचा :

PHOTO:पत्रकार ते निधड्या छातीचा शिवसैनिक; असा आहे संजय राऊतांचा प्रवास

Jitendra Awhad Case : ‘मविआ’ सरकारच्या काळात पुरावे असूनही कारवाई होत नव्हती; चंद्रशेखर बानकुळेंचा आरोप

Bharat Jodo Yatra : राज्यातील महिला मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी : जयराम रमेश

दरम्यान अंधेरीची पोटनिवडणूक लागली तेव्हा, या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण गोठवले आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे पक्षाचे नाव तर शिंदे गटाला ढाल तलवार आणि ठाकरे गटाला मशाल हे पक्षचिन्ह दिले आहे. शिवसेना पक्षावर हक्क कोणाचा याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी