31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरराष्ट्रीयदिल्लीत भाजपची 15 वर्षांची सत्ता कोसळली; आम आदमी पक्षाला मतदारांचा कौल

दिल्लीत भाजपची 15 वर्षांची सत्ता कोसळली; आम आदमी पक्षाला मतदारांचा कौल

आज दिल्ली महापालिकांच्या निकालामध्ये भाजपची सफाई होऊन मतदारांनी अरविंद केजरीवाल यांच्या झाडूला पसंती दिली आहे. दिल्लीतील 15 वर्षांची सत्ता अरविंद केजरीवाल यांनी आपल्याकडे खेचून आणली आहे.

आज दिल्ली महापालिकांच्या निकालामध्ये भाजपची सफाई होऊन मतदारांनी अरविंद केजरीवाल यांच्या झाडूला पसंती दिली आहे. दिल्लीतील 15 वर्षांची सत्ता अरविंद केजरीवाल यांनी आपल्याकडे खेचून आणली आहे. आम आदमी पक्षाने बहुमताचा 226 जागांचा आकडा पार करत जागांवर 135 जागा मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतीय जनता पक्ष 102 जागांवर पिछा़डीवर राहिला असून काँग्रेसचा मतांचा टक्का खुपच खाली घसरल्याचे दिसत आहे. काँग्रेसला अवघ्या 7 जागा मिळाल्याचे आतापर्यंत हाती आलेल्या निकालांवरुन दिसत आहे.

दिल्ली महापालिकांच्या निवडणूकांची मतगणना सुरू आहे. आम आदमी पक्ष आणि भाजप या दोन पक्षांमध्ये आटीतटीची लढाई मतमोजणी दरम्यान दिसून आली दिल्लीच्या 135 जागांवर विजय मिळवत आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या 15 वर्षांच्या सत्तेला आपल्याकडे खेचून आणले आहे. निकालाचे संपूर्ण आकडे जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र आम आदमी पक्षाने बहुमताचा आकडा पार केल्याने मतदारांनी केजरीवाल यांना कौल दिल्याचे दिसत आहे.

मतदान मोजणी सुरू झाल्यापासूनच आम आदमी पक्ष भाजपच्या पुढे असल्याचे दिसून येत होते. सकाळी दहा वाजलेपासून भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये काँटे की टक्कर असे चित्र दिसून येत होते. दरम्यान 250 जागांचे मतमोजणीचे पहिले चित्र समोर आले त्यावेळी भारतीय जनता पक्षाला टक्कर देत आम आदमी पक्षाने भाजपची 15 वर्षांची सत्ता आपल्याकडे खेचून आणल्याचे दिसून आले. दरम्यान दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील जोरदार जल्लोष करायला सुरूवात केली आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत देखील वाढ झालेली दिसून आली.
हे सुद्धा वाचा
सीमा वादाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात नेत्यांमध्येच वाद पेटला
UPSC Mainsचा निकाल जाहिर, जाणून घ्या मुलाखतींबाबतची पूर्ण माहिती
बदली प्रमाणपत्राशिवायही शाळांमध्ये मिळणार प्रवेश; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी गेल्या निवडणुकांच्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढलेली आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या मतांची टक्केवारी 39 टक्के असल्याची दिसत असून काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीमध्ये आणखी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या निवडणूकीपेक्षा काँग्रेसची मतांची टक्केवारी ९ टक्क्यांनी घटली असून 12.5 टक्के मते या निवडणुकीत काँग्रेसला मिळाली आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला 272 प्रभागांमध्ये 181 जागा आम आदमी पक्षाला 49 जागा आणि काँग्रसेला 31 जागावर विजय मिळाला होता.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!