31 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरराष्ट्रीयदिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा विनयभंग

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा विनयभंग

मद्यधुंद कार चालकाने विनयभंग करत १५ मीटर फरफटत नेले. स्वाती मालीवाल यांनी स्वतः ट्विट करून या घटनेला दुजोरा दिला आहे. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे देशाच्या राजधानीत महिला किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दिल्लीतल्या कांझवाला येथे तरुणीला फरफटत नेल्याचे वादळ शमत नाही तोच चक्क महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून या घटनेला दुजोरा दिला आहे. त्याचप्रमाणे दिल्लीत नेमकं काय सुरू आहे ? शहरात प्रवास करणाऱ्या महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

या घटनेत मालीवाल थोडक्यात बचावल्या असून, मालीवाल यांचा मद्यधुंद कार चालकाने विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. दिल्ली एम्सच्या गेट नंबर दोनसमोर मालीवाल यांना एका कारने धडक दिली. कार चालविणाऱ्याने मद्य प्राशन केले होते. मालीवाल यांना धडक दिल्यानंतर कारने त्यांना10 ते 15 मीटरपर्यंत ओढत नेले होते. ही घटना गुरुवारी पहाटे 3.11 वाजता घडली. कार चालकाने खिडकीबंद केल्याने हात अडकला. त्यावेळी कारचालकाने साधारण 10 ते 15 मीटरपर्यंत ओढत नेले. याप्रकरणी पोलिसांनी 47 वर्षीय कारचालक हरिश्चंद्रला अटक केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : दिल्लीत कारने तरुणीला चार किमी फरफटत नेले; मृत तरुणीची आई म्हणाली हा कसला अपघात?

आश्रमशाळेतील 6 मुलींवर बलात्कार करणारा संचालक पोलीसांच्या ताब्यात

नेमकी घटना काय?
या प्रकरणावर स्वाती मालीवाल यांनी स्वत:च्या ट्वीटर हँडलरवरून याची माहिती दिली. गुरुवारी रात्री उशिरा मी दिल्लीतील महिला सुरक्षेच्या स्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी एका ड्रायव्हरने मद्यधुंद अवस्थेत माझा विनयभंग केला. त्याला पकडले असता त्याने माझा हात गाडीच्या खिडकीत अडकवत कारसोबत साधारण 10 ते 15 मीटर फरफटत नेले. दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला असे म्हणत त्यांनी दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच सुरक्षित नसतील तर काय परिस्थिती असेल याची कल्पना करा, असे मालीवाल यांनी म्हटले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी