27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराष्ट्रीयद्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती, शपथविधी सोहळा संपन्न

द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती, शपथविधी सोहळा संपन्न

टीम लय भारी

दिल्ली : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज राष्टपतीपदासाठी शपथविधी पार पडला. देशाच्या 15 व्या राष्ट्रपती मुर्मू यांनी संसदभवनात राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी भारताचे सरन्यायधीश एन.व्ही रमण्णा यांनी ही शपथ दिली. सकाळी साडेदहा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणूकीत भाजप नेत्या द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी गटातील उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करून आपला विजय निश्चित केला. द्रौपदी मुर्मू या पहिल्या महिला आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून देशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झाल्या आहेत.

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यास अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रिपरिषदचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारचे प्रमुख, नागरी आणि लष्करी अधिकारी यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती. द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने आता आदिवासी समाजाला देशातील सर्वोच्च नेतृत्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे आतातरी आदिवासी समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अडचणी, आदिवासी संस्कृती असे कायम मागे राहिलेले एक ना अनेक प्रश्न मार्गी लागलील का याकडे आता सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

कोण आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू?

द्रौपदी मुर्मू या ओडीसा येथील आदिवासी नेत्या आहेत. अत्यंत गरीबीत सुद्धा जिद्दीने खडतर प्रवास करीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतर ओडिशातील BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 या काळात त्यांनी मंत्रीपद भूषवले, शिवाय त्यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणून देखील काम पाहिले आहे. दरम्यान द्रौपदी मुर्मू यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच आदिवासी समाजाला हा बहुमान प्राप्त झाला आहे, त्यामुळे मुर्मू यांच्या गावी मोठा उत्सव साजरा करण्यात येेत आहे.

हे सुद्धा वाचा…

‘पाठीमागे उभे राहून माझ्या अंगावरून हात फिरवला’, शिवसेना महिला पदाधिकाऱ्याची ‘या’ नेत्याविरोधात तक्रार

शिवसेनेला धक्का! मोदी सरकारकडून आदित्य ठाकरेंवर कारवाई?

‘राजा वही बनेगा जो हकदार होगा’, संदीप देशपांडे यांच्याकडून सूचक ट्वीट

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!