27 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरराष्ट्रीयद्रौपदी मुर्मू 'राष्ट्रपती' पदावर विराजमान

द्रौपदी मुर्मू ‘राष्ट्रपती’ पदावर विराजमान

टीम लय भारी

मुंबई: सर्वाधिक काळ राज्यपाल पदावर राहण्याचा विक्रम केलेल्या द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या पदावर विराजमान विराजमान झाल्या आहेत.त्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती आहेत. एनडीएचे यशवंत सिन्हा द्रौपदी मुमूंच्या विरोधात उभे होते. द्रौपदी मुर्मूं 5 लाख 77 हजार 777 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर यशवंत सिन्हा यांना 2 लाख 61 हजार 62 मतं मिळाली आहेत. त्यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत 16 आमदारांची मत फुटल्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपचे वरिष्ठ नेते आज रात्री द्रौपदी मुमूंची भेट घेणार आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा विजय ही ओडिसासाठी अभिमाची गोष्ट आहे. एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान झाली आहे. त्यामुळे त्यांच्या गावात आनंदोत्स साजरा केला जात आहे. त्या ‘संथाला’ समाजाच्या महिला आहेत. ओडिसामध्ये 62 आदिवासी समूह आहेत त्या पैकी ‘संथाला’ हा एक आदिवासी समूह आहे.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा उदया संध्याकाळी 5.30 वाजता निरोप समारंभ होणार आहे. या निमित्ताने मेजवाणीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीपासुन गल्लीपर्यंत एकच जल्लोष सुरु आहे. दिल्लीच्या हाॅटेल अशोकामध्ये या मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षांसहित सर्व लोकसभा राज्यसभा सदस्य उपस्थित राहणार आहेत.ओम बिर्ला हे रामनाथ कोविंद यांच्या निरोपाचे भाषण करणार आहेत. यावेळी कोविंद यांना सदस्यांकडून एक प्रशस्तिपत्र, एक स्मृती चिन्ह आणि संसदेतील सदस्यांचे हस्ताक्षर असलेले पुस्तक भेट देण्यात येणार आहे.

हे सुध्दा वाचा:

VIDEO : शिंदे सरकारचा ‘आरे’वर घाव!

VIDEO : ईडीच्या चौकशी विरोधात काँग्रेसचे आंदोलन पेटले

 चक्क ‘एटीजी’ मशिनमधून मिळतेय रेशन

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!