29 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराष्ट्रीयदुरदर्शन, आकाशवाणीला येणार अच्छे दिन!

दुरदर्शन, आकाशवाणीला येणार अच्छे दिन!

दुरदर्शन (Durdarshan) आणि आकाशवाणीला (Akashvani) आता अच्छे दिन येणार आहेत. केंद्र सरकारने दुरदर्शन आणि आकाशवाणीच्या पायाभूत सुविधा (infrastructure) वाढविण्यासाठी मोठी आर्थिक तरतुद केली आहे. खरे तर देशाच्या ग्रामीण भागात आज देखील दुरदर्शन आणि आकाशवाणी हे प्रसारमाध्यम आणि लोकशिक्षणाचे आजही प्रमुख अंग राहिलेले आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी शिक्षण, मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन आहे. प्रसार भारतीने कोविड महामारीच्या काळात सार्वजनिक आरोग्य संदेश आणि जनजागृती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आकाशवाणी (AIR) आणि दूरदर्शनच्या (DD) पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 2,539.61 कोटी रुपये खर्चाच्या केंद्रीय क्षेत्र योजना “प्रसारण पायाभूत सुविधा आणि नेटवर्क विकास” (BIND) च्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. प्रसारण पायाभूत सुविधा आणि नेटवर्क विकास या योजनेमुळे आकाशवाणी आणि दुरदर्शनच्या सुविधांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधांसह मोठे आधुनिकीकरणाला गती मिळणार आहे. त्यामुळे देशातील नक्षलग्रस्त, सीमावर्ती भागात दुरदर्शन आणि आकाशवाणीची चांगल्या दर्जाची सेवा मिळण्यास मदत होईल. या योजनेमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी उच्चदर्जाचा कंटेट देण्यासाठी तसेच अधिक वाहिन्या सामावून घेण्यासाठी डीटीएच प्लॅटफॉर्मची क्षमता सुधारून प्रेक्षकांना वेगगेवगळ्या पद्धतीचा कंटेटची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

सध्या, दूरदर्शन 28 प्रादेशिक वाहिन्यांसह 36 टीव्ही चॅनेल चालवते आणि आकाशवाणी 500 हून अधिक प्रसारण केंद्रे चालवते. या योजनेमुळे देशातील AIR FM ट्रान्समीटरची व्याप्ती भौगोलिक क्षेत्रानुसार 66% आणि लोकसंख्येनुसार 80% पर्यंत वाढेल जे आधी अनुक्रमे 59% आणि 68% होते. या योजनेत दुर्गम, आदिवासी, नक्षलग्रस्त आणि सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना 8 लाखांहून अधिक डीडी डिश STB चे मोफत वितरण करण्याची योजना आहे.

हे सुद्धा वाचा 

‘आता उरलेले उद्योग उत्तर प्रदेशच्या घशात घालण्यासाठी योगींना पायघड्या’
नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्र मोदींचा मोठा कार्यक्रम!

मुंबई पोलीस दलात ‘विशेष पोलीस आयुक्त’ पदाची निर्मिती, पहिला मान देवेन भारती यांना!

सार्वजनिक प्रसारणाची व्याप्ती वाढवण्याबरोबरच, प्रसारणाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण तसेच, डीडी फ्री डिशचा विस्तार करण्याच्या प्रकल्पामुळे डीडी फ्री डिश डीटीएच बॉक्सेसच्या निर्मितीमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी