28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयEknath Shinde : मंत्रीमंडळाच्या विस्ताराबद्दल एकनाथ शिंदे यांचे पहिल्यांदाच मोठे विधान

Eknath Shinde : मंत्रीमंडळाच्या विस्ताराबद्दल एकनाथ शिंदे यांचे पहिल्यांदाच मोठे विधान

मंत्रीमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबणीवर जात आहे. नवनवीन मुहूर्तांची केवळ चर्चा होत आहे. पण प्रत्यक्षात मंत्रीमंडळ विस्तार होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्चाची माहिती दिली आहे.

मंत्रीमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबणीवर जात आहे. नवनवीन मुहूर्तांची केवळ चर्चा होत आहे. पण प्रत्यक्षात मंत्रीमंडळ विस्तार होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्चाची माहिती दिली आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे, असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. पुढच्या आठवड्यात विस्तार होईल का असे विचारले असता, पुढच्या आठवड्यात कशाला त्या अगोदरच – लवकर विस्तार होईल, असे शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या या विधानामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे चित्र दिसत आहे.

एकनाथ शिंदे सध्या नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होईल, असे त्यांना पत्रकारांनी विचारले. मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे शिंदे म्हणाले. पुढील आठवड्यात विस्तार होईल का, असा उपप्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर पुढच्या आठवड्यात कशाला, या आठवड्यातच विस्तार होईल, असे ठोस उत्तर शिंदे यांनी दिले.

हे सुद्धा वाचा

Bhandara Rape Case : एकनाथ शिंदेंनी पोलिसांना दुबळे केले, अन् महिलेवर झाला अघोरी बलात्कार

एकनाथ शिंदेंनी केल्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Cabinet Expansion : ‘मंत्रीमंडळ विस्ताराला यश मिळण्यासाठी कामाख्या देवीला 40 रेड्यांचा बळी द्या’

नवी दिल्लीचा दौरा आणि मंत्रीमंडळ विस्तार या दोन्ही बाबींचा काहीही संबंध नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. मंत्रीमंडळ विस्तार करण्यासाठी कोणताही अडथळा नाही. राज्य सरकारची कोणतीही कामे थांबलेली नाहीत. मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही दोघेही योग्य पद्धतीने निर्णय घेत आहोत, असा दावाही शिंदे यांनी यावेळी केला.
भंडारा जिल्ह्यातील बलात्कार घटनेसंदर्भात विचारले असता शिंदे म्हणाले की, पोलीस योग्य दिशेने तपास करीत आहेत. कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही.

दरम्यान, राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नसल्याने सध्या तरी सचिवांना निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. पण असे हे आणखी किती दिवस चालणार आणि किती दिवस फक्त दोनच जणांचे मंत्रिमंडळ याराज्याचा गाडा हाकणार, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तर दुसरीकडे मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आपल्या फैलावर घेण्यास देखील सुरुवात केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी