28 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरराष्ट्रीयFarmers protest : किमान आधारभूत किमतीसाठी पुन्हा एकदा शेतकरी देणार सरकारला टक्कर

Farmers protest : किमान आधारभूत किमतीसाठी पुन्हा एकदा शेतकरी देणार सरकारला टक्कर

किमान आधारभूत किमतीसाठी पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. किमान आधारभूत किमतीच्या म्हणजे एमएसपी हमीसह अनेक मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत दाखल होण्याच्या तयारी आहेत. उदया सोमवारी जंतरमंतर येथे शेतकरी आंदोलन करणार आहेत.

किमान आधारभूत किमतीसाठी पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. किमान आधारभूत किमतीच्या म्हणजे एमएसपी हमीसह अनेक मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत आंदोलन  करणार आहेत. शेतकऱ्यांनी निदर्शन करण्याचे आवाहन करण्यापूर्वीच पोलिसांनी दिल्ली हरियाणाला जोडणाऱ्या टिकरी सीमेवर सिमेंटचे बॅरिकेट उभारण्यास सुरुवात केली आहे. मागच्या वेळच्या हिंसाचाराच्या घटना विचारात घेऊन सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निदर्शनासाठी शेतकरी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत.

दिल्लीकडे येत असतांना शेतकरी नेते राकेश टिकैत यांना दिल्ली पोलिसांनी रविवारी (21ऑगस्टला) गाझीपूर सीमेवर रोखले. राकेश टिकैत यांना दिल्लीला जायचे होते. मात्र पोलिसांनी नकार दिला. त्यानंतर टिकैत समर्थकांनी रस्त्यावर बसून विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी सगळयांना मधु विहार पोलिस एसीपी कार्यालयात नेले. 2020 आणि 2021 मध्ये दिल्लीमध्ये मोदी सरकारच्या विरोधात शेतकरी आंदोलन ( Farmers Movement) पेटले होते. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अखेर दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलन संपुष्टात आले होते. कोरोना काळात सुरूवातील शेतकरी आंदोलक ठाण मांडून बसले होते. या आंदोलनामध्ये संयुक्त किसान मोर्चातील 40 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

Nilesh Rane : हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीवरुन निलेश राणेंनी उपटले सरकारचे कान

Irrigation scam : काय आहे सिंचन घोटाळा ?

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे 1,135 कोटींचे नुकसान

सरकारने आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. युपी आणि हर‍ियाणा सरकारने आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे मान्य केले होते. शेवटी किसान मोर्चाने स‍िंघू सीमेवर बैठक घेऊन हे आंदोलन संपवले होते.

आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात एकाचा मृत्यू झाला होता. शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला होता. ट्रॅक्टर परेडदरम्यान शेतकरी आंदोलकांचा संघर्ष पेटला होता. शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅर‍िकेटस तोडले होते. 26 जानेवारीला लाल‍ किल्ला परिसरात शेतकरी आणि पोलीस यांच्यात मोठा संघर्ष झाला होता.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी