28 C
Mumbai
Monday, September 18, 2023
घरराष्ट्रीयगणपती उत्सवाच्या काळात 'या' भागात बँक बंद

गणपती उत्सवाच्या काळात ‘या’ भागात बँक बंद

यंदा १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. काही शहरांमध्ये १८, १९ आणि २० सप्टेंबर असे तीन दिवस बँका बंद राहतील. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या कॅलेंडरनुसार, १८ सप्टेंबर रोजी कर्नाटक राज्यातील बेंगळुरू, तामिळनाडू राज्यातील चेन्नई आणि तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे गणेश (विनायक) चतुर्थीच्या निमित्ताने बँका बंद राहतील.

गणेश चतुर्थी हा भारतातील सर्वात लोकप्रिय उत्सवांपैकी एक आहे, विशेषत: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यात गणेशोत्सव मोठ्या संख्येने साजरा केला जातो.

१९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी निमित्ताने अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी येथे बँका बंद राहतील. दुसऱ्या दिवशी २० सप्टेंबर रोजी भुवनेश्वर आणि पणजीमध्ये गणेश चतुर्थी निमित्ताने बँका बंद राहतील.

हे ही वाचा 

गणरायाच्या आगमनाअगोदर रस्ते खड्डेमुक्त करा; अश्विनी भिडे यांचे आदेश 

कोकणकरांना गणेशोत्सवाला गावी जाण्यासाठी भाजपची नमो एक्स्प्रेस धावली!

गणेशोत्सव 2023: शेजारी राज्यांना ‘या’ जिल्ह्यातील मूर्तिकार पाठवत आहेत दीड लाख गणेश मूर्ती

विविध शहरांकरिता गणेश मूर्ती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त
शहर – वेळ
नवी दिल्ली – सकाळी ११:०१ ते दुपारी १:२८
चेन्नई – सकाळी १०:५० ते दुपारी १:१६
जयपूर – सकाळी ११:०७ ते दुपारी १:३४
हैदराबाद – सकाळी १०:५७ ते दुपारी १:२३
गुडगाव – सकाळी ११:०२ ते दुपारी १:२९
चंदीगड – सकाळी ११:०३ ते दुपारी १:३०
कोलकाता – सकाळी १०:१७ ते दुपारी १२:४४
मुंबई -सकाळी ११:१९ ते दुपारी १:४३
बेंगळुरू – सकाळी ११:०१ ते दुपारी १:२६
अहमदाबाद – सकाळी ११:२० ते दुपारी १:४३
नोएडा – सकाळी ११:०१ ते दुपारी १:२८

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी