29 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरराष्ट्रीयगोव्यात फिरायला जाताय; मग हे अॅप डाऊनलोड करा !

गोव्यात फिरायला जाताय; मग हे अॅप डाऊनलोड करा !

जगभरातील पर्यटक भारतात पर्यटनासाठी गोव्याला पसंती देतात, निळाशार समुद्र, पौर्तुगीज शैलीतील अनेक चर्चेस, घरे, गोव्याची खास सांस्कृतिक ओळख, समुद्र किनारे, खाद्यसंस्कृती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षितता आणि शांतता. त्यामुळे गोव्याकडे पर्यटकांचा ओढा असतो. पर्यटक आणि गोव्यातील टॅक्सी व्यवसायिकांना सोईचे ठरेल असे गोवा टॅक्सी अॅप गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते नुकतेच लॉन्च करण्यात आले.

गोव्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे पर्यटकांना गुणवत्तापूर्ण सोईसुविधा देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत असते. गोव्यातील टॅक्सी व्यवसायिक आणि पर्यटकांना फायदेशीर ठरेल असे गोवा टॅक्सी अॅप सरकारने आणले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, हे अॅप सुरु झाल्यामुळे टॅक्सी व्यवसायिक समुदाय तसेच गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी फायदेशीर ठरेल. आम्ही पर्यटन क्षेत्रात तंत्रज्ञान आणले असून सुरक्षा ही आमची प्रमुख जबाबदारी असल्याचे देखील सावंत यांनी सांगितले.

वेळ, पैसा आणि सुरक्षा हे तीनही घटक पर्यकांसाठी महत्वाचे आहेत. गोवा टॅक्सी ऍप या तिन्ही घटकांची परिपूर्णता करतो. आता पर्यटकांसाठी गोवा टॅक्सी ऍप उत्तम पर्याय ठरु शकेल असे गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरणाच्या वाटेतील काटे दूर; आज नोटिफिकेशन निघणार?
मी अम्मा होता, होता राहिले; गिरीजा ओकने सांगितला ‘तो’ किस्सा !
“हे तर येड्याचे सरकार!” मंत्रीमंडळ बैठकीवर कोट्यवधींच्या उधळपट्टीवरुन नाना पटोलेंचा घणाघात..

गोवा हे पर्यटकांच्या प्रमुख् आकर्षणाचे एक राज्य आहे. येथे पर्यटकांच्या गरजांना प्राथमिकता देण्यात येते, त्यांच्यासाठी सोई, सुविधा उपलब्ध करुन देण्यावर सरकारचा भर असतो. पर्यटनातून गोवा सरकारला मोठा महसुल देखील मिळतो. गोव्याची प्रमुख गंगाजळी ही पर्यटन व्यवसायावर अवलंबून असल्याने गोवा सरकार देखील पर्यटन उद्योगाला कशी चालना मिळेल यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी