26 C
Mumbai
Monday, March 20, 2023
घरराष्ट्रीय१२ पैकी आणखी किती विमानतळे अदानींच्या ताब्यात जाणार? उत्पन्न वाढीसाठी विमानतळांच्या...

१२ पैकी आणखी किती विमानतळे अदानींच्या ताब्यात जाणार? उत्पन्न वाढीसाठी विमानतळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव

महसूलवाढीसाठी देशातील आणखी १२ विमानतळाचे खासगीकरण करण्यात येणार असून उद्या १ फेब्रुवारी रोजी हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. राष्ट्रीय मालमत्ता मुद्रीकरण योजनेतंर्गत आणखी उत्पन्न वाढविण्यासाठी काही नवीन योजना सादर करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी २०२३ चा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्यावेळी हा प्रस्तावही सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘टाइम्स नाऊ’ या संकेतस्थळाने दिली आहे. याआधीच सहा विमानतळांचा ताबा अदानी समूहाकडे सोपविण्यात आला आहे. त्यावरून विरोधकांनी बराच गदारोळ केला होता. आता या १२ पैकी आणखी किती विमानतळे अदानींकडे सोपविणार असा सवाल उपस्थित होत आहे. (How many more airports out of 12 will be taken over by Adani)

राष्ट्रीय मालमत्ता मुद्रीकरण योजनेतंर्गत नागरी उड्डाण मंत्रालयाला उत्पन्नवाढीचे लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. २० हजार कोटी रुपये उभारण्याचे काम नागरी उड्डाण मंत्रालयाला देण्यात आले आहे. येत्या ४ ते ५ वर्षांत पायाभूत सुविधांचा विस्तार आणि विकास करण्यासाठी ९,८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची महत्वकांक्षी योजनाही राबविण्यात येणार आहे. या गुंतवणुकीचा सर्वात मोठा वाटा खासगी गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. त्यामुळेच उद्याच्या अर्थसंकल्पात विमानतळ खासगीकरणाचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ज्या १२ विमानतळाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे त्यामध्ये रायपूर, जबलपूर, विजयवाडा, कोलकाता. इंदौर आदी विमानतळाचा समावेश आहे. देशातील या महत्त्वाच्या विमानतळाचे खासगीकरण करण्यात येणार आहे. विमानतळाच्या खासगीकरणाच्या माध्यमातून ८००० कोटींपेक्षा अधिक निधी उभारण्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाचे लक्ष्य आहे.

सहा विमानतळे अदानी समूहाच्या ताब्यात
केंद्र सरकारने २०१९ मध्ये गुवाहाटी, जयपूर, लखनऊ, अहमदाबाद, तिरुअनंतपुरम, आणि मंगळुरु देशातील या सहा विमानतळाचा कारभार पीपीपी तत्त्वावर अदाणी समूहाच्या ताब्यात सोपवला होता. यासाठी अदानी समूहाने विमानताळ प्राधिकरणाला २,४४० कोटी रुपये एकरकमी अदा केले होते. त्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. जुलै २०२१ मध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचा ताबाही अदाणी समूहाकडे गेला होता. यासाठी ५० वर्षांचा करार करण्यात आला असून पुढील ५० वर्षे ही विमानतळांवर अदानी समूहाचा ताबा राहणार आहे. विमानतळाची देखभाल, प्रशासकीय काम आणि विमानतळाचा विकास या सर्व गोष्टी अदानी समूहामार्फत करण्यात येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

लक्ष्मण जगताप यांच्या आजारपणातच भाजपने रचले होते आमदारकीच्या निवडणुकीचे कारस्थान, राष्ट्रवादी नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ!

Super Exclusive : जिना म्हणाले होते, लोकमान्य टिळकांनी हिंदू – मुस्लिम ऐक्य घडवून देशाची सेवा केली; दीपक केसरकरांनी वितरीत केलेल्या पुस्तकातून समोर आला इतिहास

बजेट २०२३ : ‘सेक्स’वर कर, तुमच्या आत्म्यावरही कर ; या आहेत जगातील जुलमी कर पद्धती

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी