30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरराष्ट्रीय‘मी इंदिरा गांधीची सून आहे, घाबरणार नाही‘ - सोनिया गांधी

‘मी इंदिरा गांधीची सून आहे, घाबरणार नाही‘ – सोनिया गांधी

टीम लय भारी

मुंबई: ‘नॅशनल हेराॅल्ड’ प्रकरणी आज काॅंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ‘ईडी’ कार्यालयात चैकशीला बोलावले होते. ‘ईडी’ने सोनिया गांधीसाठी 50 प्रश्नांची लिस्ट तयार केली होती. सोनिया गांधीच्या चैकशीच्या निषेधार्थ मुंबईत काॅंग्रेसचे कार्यकर्ते एकवटले होते. त्यांनी सकाळी काॅंग्रेस आंदोलनाला सुरुवात केली. मुंबईत काॅंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोनिया गांधीची आज तीन तास ईडीने चैकशी केली. त्यांना पुन्हा सोमवारी बोलावण्यात आले आहे. आज त्यांच्या सोबत राहूल गांधी आणि प्रियांका गांधी देखील होत्या.

मुंबईचा सीएसटी परिसर आज काॅंग्रेस आंदोलकांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. सोनिया गांधी ‘संघर्ष करो हम तुम्हारे साथ है’. ‘सोनिया गांधी नही आंधी दुसरी इंदिरा गांधी है’. अशा घोषणा आंदोलक देत होते. सोनिया गांधीनी देखील मी इंदिरा गांधींची ‘सून’ आहे. मी घाबरणार नाही असे मोदी सरकारला निकक्षून सांगितले आहे. नॅशनल हेराॅल्ड प्रकरणी आज काॅंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडी कार्यालयात चैकशीला बोलावले होते.

ईडीने सोनिया गांधीसाठी 50 प्रश्नांची लिस्ट तयार केली होती. सकाळी काॅंग्रेस कार्यकत्र्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. या प्रकरणी दिल्ली अकबर रोडवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना पोलिसांनी अटक केली. सोनिया गांधीची तब्बेत खराब होण्याच्या करणाने त्यांना चैकशीसाठी वेगळया खोलीत बसवण्यात आले होते. प्रियंका गांधी देखील त्यांच्या सोबत होत्या. सोनिया गांधीच्या वकीलांना चैकशीच्या वेळी उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.

काॅंग्रेस नेता शशी थरुर यांनी देखील सोनिया गांधीवर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, सरकार घरी जावून सोनिया गांधीची चैकशी करु शकत होती. मोदी सरकार ईडीचा गैरवापर करत आहे. यापूर्वी सोनिया गांधीना दोन वेळा समन्स बजावण्यात आला होता. सोनिया गांधी यांना 8 जून, 11 जून आणि 23 जुनला नोटीस देण्यात आली होती. मात्र तब्बेत खराब असल्या कारणाने, त्या चैकशीला हजर राहिल्या नाहीत. नॅशनल हेराॅल्ड प्रकरणी काॅंग्रेस नेता राहूल गांधी यांची यापूर्वी एकदा 5 तास चैकशी तब्बल आतापर्यंत त्यांची 40 तास चैकशी करण्यात आली आहे.

हे सुध्दा वाचा:

मुंबईकरांनो तब्येतीची काळजी घ्या !

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा आज निकाल, कोणत्या उमेदवाराला मिळणार पद?

कृष्णा नदीत पुन्हा आढळले मृत मासे

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!