IAS टीना डाबी यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. राजयस्थानमधील जयपूर शहारातील एका रुग्णालयात त्यांची प्रसूती झाली असून त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे आयएएस टीना डाबी आणि त्यांचे पती IAS प्रदीप गावंडे यांच्या कुटुंबात आंनदाचे वातावरण आहे. टीना डाबी त्यांच्या कामामुळे प्रसिद्ध असून सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.
टीना डाबी या सन 2015 सालच्या IAS बॅचच्या टॉपर आहेत. जुलै महिन्यात त्या प्रसुती रजेवर गेल्या होत्या. प्रेग्नंसीच्या काळात त्यांनी राजस्थान सरकारकडे नॉन फिल्ड पोस्टींगसाठी विनंती केली होती. त्यानंतर त्या प्रसूती रजेवर गेल्या होत्या. त्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार पाहत होत्या. त्या रजेवर गेल्यानंतर आयएएस आशीष गुप्ता हे सैसलमेरचे जिल्हाधिकारी म्हणून आले.
View this post on Instagram
मुळच्या भोपाळच्या रहिवासी असलेल्या टीना डाबी यांनी 2015 साली युपीएससी परीक्षेत प्रथम आल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर आलेले जम्मू काश्मिरचे अतहर आमिर यांच्यासोबत त्यांचा सन 2018 साली विवाह झाला होता. त्यांच्या विवाहाची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. मात्र काही काळात दोघांनी वेगळे होत घटस्फोट घेतला. त्यानंतर सन 2022 साली टीना डाबी यांनी आयएएस प्रदीप गावंडे यांच्यासोबत विवाह केला. या दाम्पत्याला आज मुलगा झाला.
जैसलमेरच्या जिल्हाधिकारीपदावर असताना टीना डाबी या त्यांच्या कामामुळे नेहमी चर्चेत असत. महिलांचे प्रश्न, शिक्षण आणि पाकिस्तानातून स्तलांतरीत झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसानाठी केलेल्या कामाबद्दल त्यांच्या नावाची चर्चा होते. पाकिस्तानातून स्थलांतरीत झालेल्या हिदू कुटूंबांना घरांसाठी जमीन, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे आदी कामे त्यांनी केली. पाकिस्तनातून स्तलांतरीत झालेल्या एका ज्येष्ठ महिलेने टीना डाबी यांना मुलगा जन्माला येईल असा आशीर्वाद दिला होता. त्यावर मुलगा किंवा मुलगी यात काहीच अंतर मी मानत नसल्याचे टीना डाबी म्हणाल्या होत्या.
हे सुद्धा वाचा
गणेशोत्सव काळात २४ तास रेल्वे सुरू ठेवा : डॉ. जितेंद्र आव्हाड
मविआ सरकारची कामगिरी भाजप सरकारपेक्षा चांगली; नाना पाटोलेंनी दाखवला प्रूफ
मराठवाड्यातील जनतेसाठी सरकारची ४५ हजार कोटींची मोठी गिफ्ट
टीना डाबी यांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या नावाची अनेकदा चर्चा असते. त्यांच्या नावाने काही फॅन पेजेस देखील आहेत. त्यावर टीना डाबी यांच्या व्हिडीओच्या रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.