30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराष्ट्रीयRajiv Gandhi Case : राजीव गांधींच्या हत्येतील दोषींबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Rajiv Gandhi Case : राजीव गांधींच्या हत्येतील दोषींबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी  यांची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा आरोपींची सुटका करण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी  यांची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा आरोपींची सुटका करण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, तुरुंगातील दोषींच्या चांगल्या वागणुकीमुळे सुटकेचे आदेश दिले जात आहेत. याआधी मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने फाशीच्या शिक्षेतील दोषी पेरारिवलनची सुटका करण्याचे आदेशही दिले होते. सर्वोच्च न्यायालयाकडून शुक्रवारी (ता. 11 नोव्हेंबर) माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या बाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला. या हत्येच्या प्रकरणात एकूण सहा जणांना दोषी ठरवण्यात आले होते. परंतु आता 30 वर्षांनंतर या दोषींची सुटका करण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राजीव गांधी यांच्या हत्येचा कट ज्यांनी रचला त्या नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांचाही या सहा जणांमध्ये समावेश आहे.
राजीव गांधी हत्येतील सहाही दोषींवर सर्वोच्च न्यायालयाकडून निरीक्षण नोंदविण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचा निर्णय सुनावताना सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, याप्रकरणी तुरुंगात असलेले एस नलिनी, जयकुमार, आरपी रविचंद्रन, रॉबर्ट पियास, सुतेंद्रराजा आणि श्रीहरन यांना चांगल्या वर्तनासाठी तुरुंगातून सोडण्यात आले आहे. तुरुंगामध्ये असताना या आरोपींचे वर्तन चांगले असल्याचे निदर्शनास आले  तुरुंगातील त्यांचे वर्तन चांगले असल्याचे आढळून आले. तसेच या दोषींनी तुरुंगात राहून विविध पदव्या प्राप्त केल्या आहेत, अशी माहिती देखील कोर्टाकडून देण्यात आली.
हे सुद्धा वाचा
एका दोषीची आधीच झाली सुटका
न्यायालयाकडून यावेळी सांगण्यात आले की, तामिळनाडू मंत्रिमंडळाने 9 सप्टेंबर 2018 रोजी दोषींना सोडण्यात यावे, अशी शिफारस केली होती. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमध्ये झालेल्या एका निवडणूक रॅलीदरम्यान तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा जागीच मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर सात जण दोषी आढळले. ज्यामध्ये एक दोषी असलेल्या पेरारिवलनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु मे महिन्यात त्यालाही सर्वोच्च न्यायालयाने सोडण्याचे आदेश दिले होते. तब्बल 30 वर्षांपेक्षा अधिक काळ या दोषी तुरुंगात होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी