27 C
Mumbai
Thursday, September 7, 2023
घरराष्ट्रीयदेशाचे नाव बदलल्याने परिस्थिती बदलणार का?

देशाचे नाव बदलल्याने परिस्थिती बदलणार का?

(सरला भिरुड)

इतिहासात डोकावून बघितले तर १९४७ साली मुस्लिम लीगने वेगळ्या राज्याची मागणी केली आणि भारत आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानी नेत्यांच्या मते भारताचे नाव हिंदुस्थान किंवा भारत हे असावे असे होते आणि त्यावरून त्यांनी पुढे विवादही केल्याचे दिसून आले. कारण इंडिया हा मोठाच प्रदेश होता अगदी इंडियन सबकांन्टीनेंट अशा अर्थाने विदेशी लोक वापरत आणि ओळखत असत. तरीही जागतिक पटावर इंडिया हेच नाव राहिले आणि भारताची छबी तशीच राहिली आणि त्याचे एक व्यक्तिमत्व समोर आले.


दोन दिवसापासून प्रसारमाध्यमे इंडीया आणि भारत या नावांवरून गदारोळ माजवत आहे, या चर्चेला सुरुवात सध्याच्या सरकारने जी २० परिषदेत, “प्रेसिडेंट ऑफ इंडिया” ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ हा शब्द वापरला म्हणून सुरू झाली. अशा तकलादू प्रश्नांमध्ये जनतेला गुंतवून ठेवले म्हणजे मुळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होते, हा उद्देश आहे पण लोकांच्या कधी लक्षात येणार? इंडिया आणि भारत या दोन्ही नावांमधून देशप्रेम दिसून येते आणि हे नावे बऱ्याच वर्षापासून आहे, त्या नावांमागे काही इतिहासही आहे. त्यामधून काही राजकीय नेत्यांनी संकुचित विचार आणून त्यावर चर्चा सुरू केलेले दिसून येतात. भारत या नावामागे काही इतिहास आहे आणि इंडिया या नावामागेही काही इतिहास आहे.

जगातील काही लोक भारत नावाने ओळखतात, जो फाळणीच्या आधी व्यापक प्रदेश होता. आणि काही इंडिया नाव हे ब्रिटिश राजवटीतही पडले असा समज असला तरी पहिल्या शतकातील परदेशी प्रवासी सिंधू नदीच्या नावाच्या अपभ्रंश पर्शियन भाषेत हिंदू झाले कारण ते ‘स’ चा ऐवजी ‘ह’ वापरतात. नंतरच्या काळातील प्रवाशांनी ‘इंडीका’ असा प्रयोग केला कारण नद्यांच्या नावावरून जगातील बहुतेक प्रदेश ओळखले जातात. जिऑग्राफ्रिका इंडीका असा एक पहिल्या शतकातील ग्रीक लेखकाचा ग्रंथ आहे.
ऋषभो मरुदेव्याश्च ऋषभात भरतो भवेत् ।
भरताद भारतं वर्षं, भरतात सुमतिस्त्वभूत् ॥
ततश्च भारतं वर्षमेतल्लोकेषुगीयते
भरताय यत: पित्रा दत्तं प्रतिष्ठिता वनम् ॥ – विष्णु पुराण (२: १-३१, ३२)

या श्लोकाचा अर्थ आहे, ‘ऋषभ मरुदेवीपासून जन्माला आले आणि ऋषभापासून भरत. भरतापासून भारतवर्ष निर्माण झाले. जेंव्हापासून पिता भरताहाती राज्यकारभार सोपवून वनात तपस्येसाठी निघून गेले तेंव्हापासून ही भूमी भारतवर्ष या नावाने ओळखली जाते.’ असे मत संशोधक, अभ्यासक संजय सोनवणी यांनी व्यक्त केले आहे.

खरे तर नावात काय आहे? असा प्रश्न शेक्सपियर यांनी केला होता. नाव बदलल्याने काय फरक पडेल? आधी पण भारतीय राजकारणामध्ये नाव बदलले किंवा पुतळे उभारणे यावरून बरेच राजकारण झालेले दिसून येते. पण प्रश्न आहे की मूलभूत प्रश्नांसाठी राजकारण का होत नाही? जसे की शेतीतील समस्या, रस्त्यांच्या समस्या, काही गावांपर्यंत शिक्षण आणि वीज सुविधा अजूनही पोहोचलेल्या नाही. दळणवळणाची साधनेसुद्धा नाही. पण मात्र माध्यमे आणि राजकारणी लोक धर्म, महापुरुष व काही महान नेते आणि त्यांची नावे यावरून घमासान युद्ध करताना दिसून येतात आणि किती मोठी ऊर्जा वाया जाते हे लक्षात येते.

लोकांनाही हे लक्षात येत नाही की पायाभूत सुविधांसाठी त्यांनी झगडायला हवे. समोर यायला हवे. नेत्यांना धारेवर धरायला हवे पण तसे मुद्देही निवडणुकीत पुढे आलेले दिसून येत नाहीत. अगदी साधेच उदाहरण द्यायचे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या दहा पंधरा वर्षापासून खूप तीव्र झालेला हा प्रश्न त्याची चर्चा मात्र कोणीच करताना दिसत नाही. एखाद दुसरा लेख सोडला तर होय. पावसाळ्यात रस्त्यावर दरवर्षी इतके खड्डे पडतात, उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष होते, वगैरे वगैरे ही यादी बरीच लांबेल.

जैन मुनि ऋषभ देव यांचा पुत्र भरत याच्या नावावरून तसेच दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र भरत यांच्या नावावरून भारत पडले, असे काही प्राचीन वाङ्मयानुसार लक्षात येते तर सिंधू नदीचा अपभ्रंश होऊन पर्शियन लोकांनी केले, हिंदू यात कुणाचाही मोठा सहभाग नाही, तरीही उगाच नसलेल्या अस्मिता जागृत करून वेळ घालवणे सुरू आहे.
भारताचे प्राचीन नाव जंबुद्वीप, मेलुहा असे असल्याचे लक्षात येते. तरीही अशीच एक चिंधी टाकली आणि मग ती घेऊन त्याच्यावरून मारामाऱ्या करत आपली माणसे दिसतात याला काय म्हणावे हे कळत नाही. त्याच्यावरून मोठमोठे रकानेचे रकाने, टीव्ही वरचे २४ तास घातलेले दिसून येतात.

या वादाला कशी सुरुवात झाली तो मुख्य प्रश्न आहे. विरोधी पक्षांनी केलेल्या एकजुटीची, ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स’ याचा शाॅटफार्म इंडिया हा होय आणि तोच सरकारला खुपला आणि हे खुळ तयार झाले. त्यावरून मग भारताच्या राष्ट्रपती, ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी त्यांनी, ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ हा शब्द वापरला. त्यात जी २० या सभेसाठी होय. त्यावरून हा गदारोळ सुरू झाला. इतिहासात डोकावून बघितले तर १९४७ साली मुस्लिम लीगने वेगळ्या राज्याची मागणी केली आणि भारत आणि पाकिस्तानची निर्मिती झाली.

पाकिस्तानी नेत्यांच्या मते भारताचे नाव हिंदुस्थान किंवा भारत हे असावे असे होते आणि त्यावरून त्यांनी पुढे विवादही केल्याचे दिसून आले. कारण इंडिया हा मोठाच प्रदेश होता अगदी इंडियन सबकांन्टीनेंट अशा अर्थाने विदेशी लोक वापरत आणि ओळखत असत. तरीही जागतिक पटावर इंडिया हेच नाव राहिले आणि भारताची छबी तशीच राहिली आणि त्याचे एक व्यक्तिमत्व समोर आले. त्याच्या वापरावरून तसेच दक्षिण भारतातही बरीच लोक इंग्रजीचा वापर करत असल्यामुळे इंडिया हेच नाव राहिले.
हे सुद्धा वाचा
INDIA आघाडीत रणनीती, कल्पकतेचा अभाव हे मतदारांना दाखवणे आरएसएसचा अजेंडा -प्रकाश आंबेडकर
बोगस ओएसडी अधिकाऱ्याच्या कारनाम्याने मुख्यमंत्री कार्यालय कोमात
एकनाथ शिंदेंना जरांगे-पाटील यांना भेटायला वेळ नाही, पण ३० दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थिती

कागदपत्रांवरही दोन हिंदीमध्ये भारत आणि इंग्रजीत इंडिया असे वर्जन तयार केले गेले. त्यामध्ये जी कॉन्स्टिट्यूशन होती १९८७ मध्ये त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा शब्द वापरला गेला. जी इंग्रजीत होती आणि हिंदीमध्ये त्याला भारत हा शब्द वापरला गेला. आत्ताच्या सरकारने जी 20 साठी प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत हा शब्द वापरला या त्यांचा उद्देश स्पष्ट असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी तसा बदल करणे आवश्यक होते. जे ऑफिशियली करायला हवे होते पण ते तसे होऊ शकले नाही त्यामुळे जी परंपरा आहे, इंग्रजीत इंडिया वापरायची आणि हिंदीमध्ये भारत तीच बरोबर आहे आणि त्यावरून एवढा गदारोळ माजवण्याला काहीच अर्थ नाही.

(लेखिका पुणेस्थित पुरातत्व आणि इतिहास अभ्यासक आहेत.)

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी