30 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरराष्ट्रीयभारतीय रेल्वेच्या 105 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याकडे अध्यक्षपद

भारतीय रेल्वेच्या 105 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याकडे अध्यक्षपद

भारतीय महिला कोणत्याच क्षेत्रात आता मागे राहिलेल्या नाहीत देशाच्या राष्ट्रपतीपदापासून अनेक महत्त्वाच्या पदांवर महिला कर्तव्य बजावत आहेत आता रेल्वे बोर्डाच्या 105 वर्षांच्या इतिहासात पहिलांदाच अध्यक्षपद एका महिला अधिकाऱ्याकडे सोपविले आहे. जया वर्मा सिन्हा जया वर्मा सिन्हा यांची कॅबिनेट सचिवालयाच्या निवड समितीने नि़युक्ती केल्याची माहिती दिली आहे. जया वर्मा सिन्हा या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा आणि सीईओ म्हणून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत राहणार असून 1 सप्टेंबर रोजी पासून त्या बदभार स्विकारणार आहेत.

एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सिन्हा यांची ओळख आहे बालासोर रेल्वे दुर्घटनेवेळी सिन्हा यांनी केलेल्या कामाचे कौतुक झाले होते. या दुर्घटनेवेळी त्यांनी मदतकार्य आणि बचावकार्यात मोठे काम केले होते. सिन्हा या 1988 च्या बॅचच्या IRTS अधिकारी आहेत. 1990 मध्ये उत्तर रेल्वेमध्ये कानपूरचे सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापकपदी त्यांची पहिल्यांदा नियुक्ती झाली होती. त्यानंतर दक्षिण पूर्व रेल्वे, उत्तर रेल्वे, पूर्व रेल्वेमध्ये जबळपास 35 वर्षे त्यांनी कर्तव्य बजावले आहे.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधींनी पुन्हा दांडपट्टा फिरवला !
गोपीचंद पडळकर-अनिल बाबर वादात उदय सामंत यांची उडी
एअर होस्टेसने असे केले इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचे स्वागत; व्हिडीओ व्हायरल !  

रेल्वेच्या महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या त्या एकमेव महिला अधिकारी आहेत. केंद्र सरकारकडून रेल्वेला मोठ्या प्रमाणात निधी पाटप केले आहे. 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेला 2.74 लाख कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. आतापर्यंत चा हा सर्वाधिक निधी आहे. अशा काळात आता एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याच्या हातात भारतीय रेल्वेची कमान येत आहे. सिन्हा यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी