30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराष्ट्रीयFirst Indian Voter Death : भारताच्या पहिल्या मतदाराचे झाले निधन

First Indian Voter Death : भारताच्या पहिल्या मतदाराचे झाले निधन

आजच्या काळात मतदान करणे हा सर्वाधिक महत्वाचा अधिकार बनलेला आहे. त्यामुळे सर्वच जण आपआपला मतदानाचा हक्क बजावत असतात. अशाच जीवनातील सर्वात महत्वाचा हक्क बजावणाऱ्या भारताच्या पहिल्या मतदाराचे निधन झाले आहे.

आजच्या काळात मतदान करणे हा सर्वाधिक महत्वाचा अधिकार बनलेला आहे. त्यामुळे सर्वच जण आपआपला मतदानाचा हक्क बजावत असतात. अशाच जीवनातील सर्वात महत्वाचा हक्क बजावणाऱ्या भारताच्या पहिल्या मतदाराचे निधन (First Indian Voter Death) झाले आहे. भारताचे पहिले मतदार होण्याचा मान मिळवणारे किन्नर येथील श्याम सरन नेगी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मृत्यूच्या दोन दिवस आधी ते हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी गेले होते. त्यांचे मतदान घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. श्याम नेगी यांना रेड कार्पेटवर आणण्यात आले आणि संपूर्ण आदराने मतदान घेण्यात आले.

श्याम सरन नेगी हे वयोवृद्ध असल्याने हिमाचल प्रदेशातील मतदान पथक नेगी यांच्या घरी पोहोचले आणि मतदानाच्या तारखेपूर्वी पोस्टल बॅलेटद्वारे त्यांचे मतदान घेतले. श्याम सरन नेगी यांनी देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिले मतदान केले होते आणि तेव्हापासून त्यांनी कधीही मतदान करण्याची संधी सोडली नाही. श्याम सरन नेगी हे 106 वर्षांचे होते आणि त्यांनी कधीही आपल्या जीवनात मतदानाची संधी सोडली नाही. श्याम सरन नेगी यांनी हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी २ नोव्हेंबर रोजीच मतदान केले होते. ते काही दिवसांपासून आजारी होते.

किन्नौरचे जिल्हाधिकारी आबिद हुसेन म्हणाले की, ‘श्याम सरन नेगी यांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात येणार आहे. त्यांना पूर्ण सन्मानाने निरोप देण्यात येणार असून त्यासाठी बँडचीही व्यवस्था करण्यात आली आहे.’ श्याम सरन नेगी यांचा जन्म 1 जुलै 1917 रोजी झाला होता. ते किन्नौरच्या कल्पामध्ये शिक्षक म्हणून काम करत होते.

श्याम नेगी कसे बनले देशाचे पहिले मतदार ?
भारतातील ब्रिटीश राजवट संपल्यानंतर 1951 मध्ये जेव्हा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तेव्हा श्याम सरन नेगी हे मतदान करणारे पहिले व्यक्ती होते. 25 ऑक्टोबर 1951 रोजी रांगेत उभे असताना मतदान करणारे ते पहिले मतदार व्यक्ती होते. त्यानंतर फेब्रुवारी 1952 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या, पण हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे ५ महिने आधी मतदान झाले. ‘सनम रे’ या चित्रपटात श्याम नेगी यांनी सेलिब्रिटी मतदार म्हणून भूमिका केली होती.

हे सुद्धा वाचा

Mumbai News : मुंबई हायकोर्टाचे नाव आता महाराष्ट्र हायकोर्ट? वाचा काय म्हणाले सुप्रीम कोर्ट

Dengue Facts : डेंग्यूबद्दलच्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा ज्यामुळे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होईल

Mumbai News : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ! मुलींची तस्करी करणारी टोळी गजाआड

हिमाचल प्रदेश येथे फेब्रुवारीमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असते आणि त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण बनते. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे यावेळीही खूप आधीच निवडणुका घेण्यात येणार आहेत, तर गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये मतदान होणार आहे. विशेष म्हणजे ‘सनम रे’ या चित्रपटात श्याम सरन नेगी देखील होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी