29 C
Mumbai
Wednesday, September 13, 2023
घरराष्ट्रीयTerrorist : दहशतवादी केवळ 30 हजार रुपयांत उडवणार होते भारतातील पोस्ट ऑफ‍िस

Terrorist : दहशतवादी केवळ 30 हजार रुपयांत उडवणार होते भारतातील पोस्ट ऑफ‍िस

भारतीय सेनेने पाकिस्तानमधून एका दहशतवाद्याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्याकडून काही गोष्टींचे खुलासे समोर आले आहेत. भारतात हल्ला करण्यासाठी दहशतवाद्याला पाकिस्तानकडून 30 हजार रुपये देण्यात आले होते. भारतीय पोस्ट ऑफ‍िस त्याच्या न‍िशाण्यावर होते.

भारतीय सेनेने पाकिस्तानमधून एका दहशतवाद्याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्याकडून काही गोष्टींचे खुलासे समोर आले आहेत. भारतात हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांला पाकिस्तानकडून 30 हजार रुपये देण्यात आले होते. भारतीय पोस्ट ऑफ‍िस त्याच्या न‍िशाण्यावर होते. या गोष्टी त्याने व्हीडीओवर कबूल केल्या आहेत. या दहशतवाद्याला भारतीय सैनिकांनी पकडले होते. राजौरी लाइन ऑफ कंट्रोलमध्ये ताे घुसला होता. तो बॉर्डरची फेंसिंग कापून आतमध्ये प्रवेश करत होता. 21 ऑगस्टला हा दहशतवादी (Terrorist) पकडला गेला होता. त्याचे नाव हुसैन आहे. तो आपल्या 4 ते 5 साथीदारांच्या मदतीने भारतीय सीमेवरुन आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होता.

भारतीय सीमेच्या जवळ असलेल्या चौकी जवळच तो तार कापण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी भारतीय सैनिकांनी त्यांना पकडले. त्यानंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी भारतीय सैन‍िकांनी त्याच्यावर फायरिंग केली. त्यामध्ये तो जखमी झाला. त्यानंतर त्याचे साथीदार घनदाट जंगलामध्ये पळून गेले. त्याला अटक करुन भारतीय सैन‍िकांनी रुग्णालयामध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची तब्बेत ठिक झाल्यावर त्याची चौकशी करण्यात आली. तो पाकिस्तानच्या कोटी जिल्हयातील राहणारा आहे. चौकशीमध्ये त्याने भारतीय पोस्ट ऑफ‍िसांवर हल्ला करण्यासाठी पाठवल्याचे कबूल केले. तसेच तबारक हुसैन याने सांगितले की, त्याला भारतीय चौकी जवळ हल्ला करण्यासही सांगितले होते. त्याने काही पोस्ट ऑफ‍िसांची रेकी केली होती.

हे सुद्धा वाचा

Aam Aadmi Party : आता ‘आम आदमी पार्टी’च्या 40 आमदारांवर भाजपची वाईट नजर, प्रत्येकी 20 कोटींची ऑफर

Nitin Gadkari : लवकरच‍ तुमच्या खात्यामधून ‘टोल’ ची रक्कम वसूल होणार – नितीन गडकरी

Ashtavinayaka Darshan : अष्टविनायक दर्शन- त‍िसरा गणपती भीमेच्या तिरावरचा ‘सिद्धटेकचा’ सिद्धिविनायक

पाकिस्तानचे कर्नल युनूस चौधरी यांनी त्याला हल्ला करण्यासाठी 30 हजार रूपये देऊन पाठवले होते. त्याच दिवशी तो पकडला गेला. तबारक हुसैन याला 2019 मध्ये या परिसरात भारतीय सैन्याने पकडले होते. त्यावेळी तो त्याचा भाऊ हारुन अली याच्या सोबत आला होता. मात्र भारतीय सैन्याने त्याला मानवी अधिकारांतर्गत सोडले होते. त्याला 2017 मध्ये पाकिस्तानमध्ये सोडले होते. तसेच 22 आणि 23 ऑगस्टला नौशेरामध्ये सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दोन दहशवाद्यांना भारतीय सैनिकांनी मारले होते. तर एकाला पकडण्यात यश आले होते. दहशतवाद्यांकडे शस्त्रे आणि पाकिस्तानी रुपये सापडले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी