29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरराष्ट्रीयअभिनेत्री कंगना रनौतची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसाठी खास पोस्ट

अभिनेत्री कंगना रनौतची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसाठी खास पोस्ट

टीम लय भारी

देशाच्या राष्ट्रपतीपदी कोण विराजमान होणार याचे राजकीय अंदाज आधीच बांधले गेले असले तरीही कोण जास्त मताधिक्यांनी जिंकणार हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांमध्येच कमालीची काल पाहायला मिळाली. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी गटाकडून यशवंत सिन्हा यांच्यात चुरशीची लढत झाली, परंतु सुरवातीपासूनच पारडे जड असणाऱ्या द्रौपदी मुर्मू अखेर विजयी होत देशाच्या सर्वाैच्चपदी म्हणजेच राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या. मुर्मू यांच्या विजयानंतर सगळीकडे जल्लोष करण्यात आल्या तर सोशल मिडीयावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान अभिनेत्री कंगना रनौतने सुद्धा द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा देत विशेष पोस्ट केली आहे.

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना 64 टक्के मतं मिळाली आणि त्या विजयी झाल्या. या विजयानंतर अनेकांकडून आता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान क्वीन अभिनेत्री कंगना रनौत हिने सुद्धा द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाने एक फोटो स्टोरी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मुर्मू यांच्या विजयावर शुभेच्छा देत असे नारी शक्तीचा उल्लेख तिने केला आहे. ‘आदिवासी समाजातून आलेली एक महिला देशातील सर्वोच्चपदी राष्ट्रपती म्हणून विराजमान होते ही मोठी बाब आहे शिवाय त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत,’ असेही तिने स्टोरीमध्ये म्हटले आहे.

अभिनेत्री कंगना रनौतची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसाठी खास पोस्ट

 

 

कोण आहेत द्रौपदी मुर्मू?

राष्ट्रपदीपदी विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिला महिला अदिवासी ठरणार असून प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर त्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरणार आहेत. द्रौपदी मुर्मू या ओडिसा येथील आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील बीजेपी आणि बीजेडी युती सरकारमध्ये 2002 ते 2004 या काळात त्यांनी मंत्री म्हणून पदभार सांभाळला आहे. त्यानंतर त्यांनी झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून सुद्धा काम केले आहे. आदिवासी समाजातील नेतृत्व आता देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होऊन संपुर्ण देशाचे नेतृत्व करणार आहेत.

हे सुद्धा वाचा…

CBSE बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर

कोरोनाचे संकट पुन्हा वाढले, 24 तासांत तब्बल 60 जणांचा मृत्यू

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला नेते एकनाथ खडसे यांच्या हटके शुभेच्छा

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!