35 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeराष्ट्रीयकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (10 मे) मतदान होणार आहे. ही निवडणूक एकाच टप्प्यात होत आहे. 244 जागांसाठी एकूण 2,615 उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या 2018 मधील विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात 72.36 टक्के मतदान झाले होते. यावेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (10 मे) मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ही निवडणूक एकाच टप्प्यात होत आहे. कर्नाटकात सर्वत्र सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होईल. 244 जागांसाठी एकूण 2,615 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये 2,430 पुरुष, 184 महिला आणि एका तृतीयपंथी उमेदवाराचा समावेश आहे. मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे. गेल्या 2018 मधील विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात 72.36 टक्के मतदान झाले होते.

निवडणूक आयोगाने मार्चमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकांची घोषणा केली होती. मतदानासाठी राज्यभरात एकूण 58,545 मतदान केंद्रे आहेत. 5 कोटी 31 लाख 33 हजार 54 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. त्यात 2 कोटी 67 लाख 28 हजार 53 पुरुष आणि 2 कोटी 64 लाख 74 महिला आणि 4,927 इतर मतदार आहेत. एकूण 11 लाख 71 हजार 558 तरुण मतदार आहेत, तर 5 लाख 71 हजार 281 दिव्यांग व्यक्ती आहेत. 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 12 लाख 15 हजार 920 मतदार आहेत. सुमारे चार लाख कर्मचारी मतदान प्रक्रियेत गुंतले आहेत.

224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होत आहे. याशिवाय, जनता दल सेक्युलर (जेडीएस) हा पक्षही रिंगणात आहे. कर्नाटकात गेल्या 38 वर्षांत सत्ताधारी पक्ष निवडून न येण्याचा इतिहास आहे. जनता दलाने 1999 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन केले होते. तेव्हापासून ते स्वबळावर सत्तेत येऊ शकलेले नाही. भाजप आणि काँग्रेससह युतीमध्ये दोनदा स्वतंत्रपणे जेडीएस सत्तेत होती.

हे सुद्धा वाचा : 

माझ्या रक्ताने लिहून देतो, कर्नाटकात काँग्रेस 150 जागा जिंकणार : डी.के. शिवकुमार

कर्नाटक निवडणूक प्रचार : देवेंद्र फडणवीस यांचा कानडी बाणा

कर्नाटक निवडणूक प्रचार : देवेंद्र फडणवीस यांचा कानडी बाणा

Karnataka Assembly Election 2023 : रिंगणातील प्रमुख उमेदवार

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (शिगगाव), विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या (वरुणा), जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी (चन्नापटना), प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार (कनकापुरा) हे निवडणूक लढवणाऱ्या आघाडीच्या उमेदवारांमध्ये आहेत. श्री सिद्धरामय्या आणि श्री कुमारस्वामी यांच्याशिवाय, जगदीश शेट्टर (हुबळी-धारवाड मध्य) हे इतर माजी मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शेट्टर यांनी नुकताच भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Karnataka Assembly Election 2023, Basavaraj Bommai Siddaramaiah, Voting on Wednesday, Karnataka Polls

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी