28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराष्ट्रीयलालू प्रसाद यादव यांच्यावर रेल्वे भरती घोटाळा प्रकरणी खटला चालविण्यास गृहमंत्रालयाची परवानगी

लालू प्रसाद यादव यांच्यावर रेल्वे भरती घोटाळा प्रकरणी खटला चालविण्यास गृहमंत्रालयाची परवानगी

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या अडचणी पून्हा वाढल्या आहेत. रेल्वे मंत्री असताना जमीनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी देण्याच्या घोटाळ्यात (railway recruitment scam) लालू प्रसाद यादव यांच्यावर सीबीआयला (CBI) खटला चालविण्यासाठी आज गृहमंत्रालयाने (Home Ministry) परवानगी दिली. सीवीआयने लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगी यांच्यासह १६ आरोपींवर या घोटाळ्याप्रकरणी खटला दाखल केला होता. (Lalu Prasad Yadav On prosecute in railway recruitment scam permission Home Ministry to CBI)

सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गृहमंत्रालयाने मंजूरी दिल्यानंतर आता दिल्लीतील विशेष न्यायालयात सीबीआयने तो खटला दाखल केला आहे. लालाप्रसाद यादव यांच्यासोबतच आता इतर आरोपींवर खटला चालविण्याच्या अडचणी दूर झाल्या आहेत. या घोटाळ्याप्रकरणी आता लालू प्रसाद यादव यांना खटला सुरू झाल्यानंतर जामीन घ्यावा लागणार आहे. सीबीआयने याआधी छापेमारीत अनेक कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये सीबीआयने लालूप्रसाद यादव, राबडी देवी, मीसा भारती आणि रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांविरोधात चार्जशीट दाखल केली होती.

हे सुद्धा वाचा

भाजप नेते किरीट सोमय्या सोमवारी कोल्हापुरात; पत्रकार परिषदेत काय बोलणार ?

सानिया मिर्झाची भावनिक पोस्ट करत टेनिसमधून निवृत्तीची घोषणा

‘लय भारी’चे व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात यांना यशवंत रत्न पुरस्कार

रेल्वे भरतीतील उमेदवारांनी खोटी कागदपत्रे रेल्वे मंत्रालयाला सादर केल्याचे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले असून लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि त्यांच्या मुलीच्या नावे नोकरीच्या बदल्यात जमीनी दिल्याचे देखील तपासात आढळून आल्याचे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. या घोटाळा प्रकरणी रेल्वेचे अधिकारी हरिदयानंद चौधरी आणि लालू प्रसाद यादव यांचे तत्कालीन ओएसडी भोला यादव याला देखील सीबीआयने यापूर्वीच अटक केली होती.

पटण्यात राहणाऱ्या अनेक व्यक्तींनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या नियंत्रणात असलेल्या एका कंपनीच्या नावे जमीनी हस्तांतरीत केल्याचा आरोप देखील आहे. अनेक उमेदवारांना रेल्वे भरतीची जाहिरात नसताना देखील देशातील काही शहरांमध्ये रेल्वेच्या सेवेत नियुक्ती दिल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जमीन घेत अनेकांना रेल्वेत नोकरी दिली होती.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी